AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतिन भारतात येण्यापूर्वी आभाळात घडत होत्या धक्कादायक गोष्टी, दोन विमानांचा लपंडाव, दिल्लीत विमान येताच…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान रशिया आणि भारतात अनेक महत्वाचे करार झाले आहेत. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. मात्र, पुतिन भारतात दाखल होण्यापूर्वी आभाळात बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या.

पुतिन भारतात येण्यापूर्वी आभाळात घडत होत्या धक्कादायक गोष्टी, दोन विमानांचा लपंडाव, दिल्लीत विमान येताच...
Russian President Vladimir Putin plane
| Updated on: Dec 05, 2025 | 5:42 PM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर असून त्यांच्यासोबत रशियाचे तब्बल 7 मंत्रीही भारतात दाखल झाले आहेत. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यामुळे अमेरिकेला चांगल्याच मिरच्या लागल्या आहेत. हेच नाही तर भारतावर अमेरिका अजून काही निर्बंध लादण्याची शक्यता आहे. भारताने अमेरिकेला निर्णय घेण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका आग्रही आहे. मात्र, पुतिन यांच्या भारत दाैऱ्यानंतर हे स्पष्ट झाले की, भारत रशियाकडून अधिक प्रमाणात आता तेल खरेदी करणार आहे. भारताचा मुख्य ऊर्जा पुरवठादार रशिया आहे. मात्र, अमेरिकेमुळे भारतावर दबाव आहे. या काळात रशिया भारतासोबत खंबीरपणे उभा आहे. व्लादिमीर पुतिन हे जगातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाते.

पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दाैऱ्याबद्दल जगाला कल्पना होती. हेच नाही तर पुतिन भारतात नेमके कधी पोहोचणार हे देखील जवळपास लोकांना माहितीये. मात्र, यादरम्यान आकाशात मोठा गेम सुरू होता. अख्ये जग पुतिन यांचे विमान शोधत होते. पुतिन यांच्या विमानाच्या ताफ्यावर जगाच्या नजरा होत्या. पुतिन यांचे विमान असे तसे नसून अत्यंत खास आणि पूर्ण सुरक्षित आहे. आता नुकताच एक मोठा रिपोर्ट पुढे आला आहे.

पुतिन यांचे फ्लाइंग क्रेमलिन दोन एकसारखे विमान भारताच्या दिशेने येत होते. दोन्ही विमानांचा मोठा लपंडाव सुरू होता. कधी एका विमानाचा ट्रान्सपॉन्डर अॉन व्हायचा तर कधी दुसऱ्याचा. हेच नाही तर अगदी थोड्या थोड्यावेळाने दोन्ही विमानांचे लोकेशनही बदलत होते. हा खेळ तब्बल साडेसहा तास आभाळात सुरू होता. थेट पुतिन यांचे फ्लाइंग क्रेमलिन दिल्ली विमानतळावर उतरले.

व्लादिमीर पुतिन यांचे सर्वाधिक ट्रक केले गेलेले विमान ठरले आहे. पुतिन हे कायमच जगाच्या नजरेतून लपून प्रवास करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाला त्यांच्या प्रवासाचे खरे लोकेशन कळू दिले जात नाही. पुतिन यांच्यासोबत फ्लाइंग क्रेमलिन दोन एकसारखी विमाने उडत होती. खरे कोणते विमान ज्यात पुतिन आहेत, हे जगाला शेवटपर्यंत समजलेच नाही. विशेष म्हणजे दोन्ही विमानांचे ट्रान्सपॉन्डर काम करत होते. कधी या विमानाचे ट्रान्सपॉन्डर काम करायेच तर कधी दुसऱ्या. हा विमानात प्रत्येक गोष्ट आहे. मिसाईल देखील या विमानात आहेत.

Follow Us
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी