AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur News : मजुराचे हत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

पैशाच्या वादातून एका सावकाराने एका मजुराला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांचा हलगर्जीपणा मजुराच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.

Latur News : मजुराचे हत्या प्रकरण, पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
मजुराच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर कारवाईImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 10, 2023 | 4:47 PM
Share

लातूर : जिल्ह्यातल्या रेणापूर येथे तीन हजार रुपयांसाठी मजुराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक दिपक शिंदे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तर इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

रेणापूर येथील मजूर गिरिधारी तपघाले यांनी गावातल्याच एका व्याजीबट्टी करणाऱ्या व्यक्तीकडून कौटुंबिक गरजेपोटी तीन हजार रुपये घेतले होते. या तीन हजार रुपयांचे चक्रदरवाढ व्याजाने आरोपी लक्ष्मण मरकड हा 20 हजार रुपये दे म्हणून तगादा लावत होता. या पैशांच्या वसुलीसाठी गिरिधारी तपघाले यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेले तपघाले हे तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी फिर्याद न घेता ‘तुम्ही अगोदर उपचार घ्या, दवाखान्यात येऊन आम्ही जवाब घेतो आणि गुन्हा दाखल करतो’, असे सांगितले होते .

मात्र चार दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. गिरिधारी तपघाले हे दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर रेणापूर इथं घरी पोहचले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी तपघाले यांच्या घरी येऊन पैशांच्या वसुलीसाठी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तपघाले यांना पुन्हा दवाखान्यात हलवावे लागले होते. यावेळी उपचारादरम्यान गिरिधारी यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर प्रसंग टाळता आला असता, असा आरोप तपघाले कुटुंबियांनी करीत पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी प्रकरणाची चौकशी करत, दोषी आढळलेल्या पोलीस निरीक्षक आणि इतर तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा