AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab : मोदींच्या राज्यात दोन लाखाच्या पुढे कॅश नेता येत नाही, मग…अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना पकडलं कोंडीत

Anil Parab : "शस्त्र परवाना घेण्याची पद्धत असते. अर्ज करावा लागतो. तो स्क्रूनिटीला जातो. स्थानिक पोलीस त्याची चौकशी करतात. अर्ज करणाऱ्यावर काही गुन्हा आहे का? हे पाहिलं जातं. घरची पार्श्वभूमी बघतात. त्याच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे बघतात"

Anil Parab : मोदींच्या राज्यात दोन लाखाच्या पुढे कॅश नेता येत नाही, मग...अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना पकडलं कोंडीत
Anil Parab
| Updated on: Oct 09, 2025 | 12:31 PM
Share

“राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आपल्यासमोर ठेवले आहेत. एवढं होऊन देखील पुराव्यासकट सर्व प्रकरणं राज्याच्या जनतेसमोर, विधानपरिषदेच्या माध्यमातून सरकार समोर ठेवली. मुख्यमंत्र्यांची अडचण माहीत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी त्यांना पाठीशी घातलं. मंत्र्याने काही केलं तरी चालतं आमचं त्यांना अभय आहे. एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत सांगितलं की, योगेश तुझ्या पाठीशी मी आहे. तुला काळजी करायचं कारण नाही. जेव्हा राज्याचा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पाठी असण्याची भावना तयार झाल्याने गृहराज्य मंत्र्याने राज्यात जे थैमान घातले, त्याचा पुरावा एका चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या जनतेसमोर आला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गँगवार सुरू आहे. कोयता गँग आहे. पुणे जिल्ह्यात 70 गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे करण्यासाठी जे लागत, म्हणजे सरकारचं पाठबळ आयतं मिळतं, हे सिद्ध झालंय” असं अनिल परब म्हणाले.

“काही दिवसापासून निलेश घायवळ प्रकरणाची आपल्या माध्यमात चर्चा आहे. हा गुंड सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर गेला आहे. त्याचे गुंड थैमान घालत आहेत. रस्त्यावर उतरलेल्या माणसांवर गोळीबार करत आहेत. त्याच्या भावाला सचिन घायवळला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजुर केला आहे.शस्त्र परवाना देणं गरजेच आहे का? ते तपासलं जातं. शस्त्र परवाना मिळवणं सोपा विषय नाही. ज्याला शस्त्र परवाना दिला जातो, त्याची समजाता इभ्रत असावी लागते. सचिन घायवळ हा निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे. याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हा दाखल आहेत” असं अनिल परब म्हणाले.

‘गृहराज्यमंत्री अर्ध न्यायिक जज असतो’

“योगेश कदम यांच्याकडे येण्यापूर्वी पोलिसांनी स्क्रूनिटी केली. त्यात पोलिसांनी अहवाल दिला. हा गुन्हेगारी पार्शवभूमीचा आहे. याचा भाऊ कुविख्यात गुंड आहे. याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल असताना तो कोर्टात सुटला. का तर हा गुंड असल्याने त्याने कोर्टात कुणाला येऊ दिलं नसेल. त्यामुळे पुराव्या अभावी त्याची सुटका झाली असेल. त्यामुळे पुराव्या अभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातील निर्दोष मुक्तता नाही. पोलिसांनी त्याचा गुन्हा नाकारला. योगेश कदमकडे अपील आलं. अपीलमध्ये पोलिसांची बाजू मांडली जाते. सुनावणी घेतली जाते. हे अर्ध न्यायिक जज आहे. गृहराज्यमंत्री अर्ध न्यायिक जज असतो” असं अनिल परब म्हणाले.

ही लाखो रुपयांची कॅश आली कुठून?

“अर्ध न्यायिक जजकडे सुनावणी होते. सुनावणीत दोन्ही बाजू मांडल्या जातात. पोलिसांनी जी बाजू मांडली त्यात हे सर्व आलं आहे. तरीही योगेश कदम यांनी जो निर्णय दिला त्यात हा माणूस किती सज्जन आहे. त्याला पैशाची ने आण करण्यासाठी शस्त्र आणण्याची गरज आहे. मोदींच्या राज्यात दोन लाखाच्या पुढे कॅश घेऊन जाण्याची परवानगी नाही. दोन लाखाच्यावर कॅश न्यायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागतं. आणि यांनी म्हटलंय मला लाखो रुपयांची कॅश द्यावी लागते. वाहतूक करावी लागते. ही लाखो रुपयांची कॅश आली कुठून?” असा सवाल अनिल परब यांनी विचारला.

Follow Us
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक