टेंडरच्या वादातून भाजपचे दोन पदाधिकारी आपसात भिडले, महापालिकेच्या आवारातच फ्री स्टाईल हाणामारी

सांगली महापालिकेत आज महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगली शहरातील एका नाल्याच्या निविदेवरुन भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. नंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.

टेंडरच्या वादातून भाजपचे दोन पदाधिकारी आपसात भिडले, महापालिकेच्या आवारातच फ्री स्टाईल हाणामारी
टेंडरच्या वादातून भाजपचे पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
Image Credit source: Google
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 20, 2023 | 7:21 PM

सांगली : टेंडरवरुन झालेल्या वादातून सांगली महापालिकेच्या आवारात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी आणि ठेकेदार अतुल माने यांच्यात ही जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अतुल माने यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यामुळे पुढील घटना टळली. परंतु पोलीस स्टेशन बाहेर सूर्यवंशी समर्थकांचा मोठा जमाव गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पक्षातील अन्य नेत्यांकडून मध्यस्थी केली जात असून, याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. धीरज सूर्यवंशी हे भाजप युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष आहेत तर अतुल माने हे पण भाजपचे पदाधिकारी आहेत.

नाल्याच्या निविदेवरुन दोन पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

सांगली महापालिकेत आज महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगली शहरातील एका नाल्याच्या निविदेवरुन भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. नंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.

महापालिकेच्या आवारातच फ्री स्टाईल हाणामारी

महापालिकेच्या आवारातच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी आणि भाजपचे सचिव अतुल माने यांच्यातील मारामारीने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी मध्यस्थी करत माराणारी रोखली

पोलिसांनी वेळीच धाव घेत मारामारी सोडवली आणि माने यांना पोलीस ठाण्यात आणले. भाजप नेत्यांनी मध्यस्थी करीत पोलिसांत तक्रार देण्यापासून दोघांना रोखले. या मारामारीची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us