ट्रेनच्या टॉयलेटमधून फरार, सराईत गुन्हेगाराने दिला पोलिसांना गुंगारा

| Updated on: Jun 05, 2023 | 1:52 PM

पुणे पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली असून लवकरच आरोपींना जेरबंद करू, असे आश्वासन दिले आहे.

ट्रेनच्या टॉयलेटमधून फरार, सराईत गुन्हेगाराने दिला पोलिसांना गुंगारा
ट्रेनच्या टॉयलेटमधून आरोपी फरार
Follow us on

नागपूर : बंगालमधून अटक केलेल्या 28 वर्षीय आरोपीला पुण्यात आणले जात असताना , त्याने पोलिसांना गुंगारा देत नागपूरजवळ ट्रेनमधून पलायन ( escaped from train toiloet)  केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, या फसवणूक प्रकरणातील आणखी एका आरोपीला पुण्याला नेण्यात आले आहे. संजय तपनकुमार जाना आणि सौरभ मैती असे आरोपींचे नाव असून ते दोघेही पुण्यात सोनार म्हणून काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाना याच्या मालकाने त्यांना दागिने बनवण्यासाठी अंदाजे 381 ग्रॅम सोने दिले होते.

मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते दोघेही सोन्याचा ऐवज घेऊन पुण्यातून फरार झाले. त्यानंतर त्यांच्या मालकाने 6 मे रोजी फरासखाना पोलिसात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला. तांत्रिक डेटाचे विश्लेषण केल्यानंतर, पोलिसांच्या एका पथकाने बंगालमधील आरोपींचा माग काढला आणि गेल्या आठवड्यात त्यांना अटक केली. स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी आरोपींना घेऊन दुरांतो एक्स्प्रेसमधून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.

शुक्रवारी सायंकाळी ही ट्रेन नागपूरजवळ आली असता आरोपी जाना याने टॉयलेट ब्रेक मागितला आणि ट्रेनच्या टॉयलेटमध्ये घुसला. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला असता तो आरोपी टॉयलेटच्या खिडकीतून पळून गेल्याचे आढळले.

पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली असून लवकरच आरोपीला जेरबंद करू, असे आश्वासन दिले आहे.