Arun Gawli : रमा नाईक मारला गेला अन्… दाऊदसोबतची दोस्ती दुश्मनीत कशी बदलली? वाचा अरुण गवळीची Inside स्टोरी

जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर अरुण गवळी 17 वर्षांनी जामीनावर सुटला आहे. एकेकाळी दाऊद इब्राहिमचा विश्वासू असलेला गवळी नंतर त्याचा कट्टर शत्रू बनला. त्याची गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात लहानपणी झाली आणि तो हळूहळू मुंबईच्या गुन्हेगारी जगात एक मोठे नाव बनला. त्याच्या पुण्यातील कारनामे आणि 'डॅडी' हे टोपणनाव देखील या लेखात चर्चेत येईल.

Arun Gawli :  रमा नाईक मारला गेला अन्... दाऊदसोबतची दोस्ती दुश्मनीत कशी बदलली? वाचा अरुण गवळीची Inside स्टोरी
अरूण गवळी दाऊदचा दुश्मन कसा झाला ?
| Updated on: Sep 06, 2025 | 12:36 PM

शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात गँगस्टर अरूण गवळी जामीनावर बाहेर आला आहे. तब्बल 17 वर्षांनी तो त्याच्या साम्राज्यात, दगडी चाळीत परतला. एकेकाळी मुंबई च्या गुन्हेगारी साम्राज्यात मोठं नाव असलेला, दाऊदशी वैर निमाभवणारा अरूण गवळी नेमका आहे तरी कोण, गुन्हेगारी विश्वात त्याची एंट्री कशी झाली, ते वाचूया.

एकेकाळी दाऊदचा खास माणूस, एके दिवशी सगळं बदललं

अरुण गवळी आहे जो एकेकाळी मुंबईचा डॉन आणि दाऊद इब्राहिमचा खास माणूस मानला जात असे, पण एक दिवस असा उगवला, जेव्हा ते दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. त्याचे पूर्ण नाव अरुण गुलाब गवळी आहे. सध्या त्याने सत्तरी ओलांडी हे. अरूण गवळीचे वडील मध्य प्रदेशाच्या खंडवाचे रहिवासी होते, मात्र कामाच्या शोधात ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातील अहमदनगर येथे अरूण गवळीचा जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गवळीला लहानपणीच घरोघरी जाऊन दूध विकावे लागले. नंतर हळूहळू तो गुंडांच्या जगात सामील झाला. या काळात तो दाऊद आणि छोटा राजनच्या जवळ येऊ लागला. बघता बघता तो दाऊदचं कन्साइनमेंटचं काम सांभाळू लागला.. पण एक दिवस असा आला की तो दाऊदचा कट्टर दुश्मन बनला.

गुन्हेगारी विश्वात एंट्री कशी झाली ?

1980 च्या दशकात अरूण गवळीची गुन्हेगारी विश्वात एंट्री झाली. शाळेत सोबत शिकणाऱ्या रामा नाईकच्या गँगशी तो जोजला गेला. ही गँग खंडणी आणि तस्करीचं काम करायची. याच काळात डॉन वरदराजन मुंबई सोडून चेन्नईला गेला आणि करीम लालाने गुन्हेगारी विश्वाचा निरोप घेतला, त्यामुळे गुन्ह्यांच्या काळ्या राज्यात फक्त रामा नाईक, दाऊद इब्राहिम आणि गवळी गँगच होती.

दाऊद-गवळीची दुश्मनीची कशी झाली ?

1986 मध्ये, दाऊदचे नाव मुंबईत लोकप्रिय होऊ लागले. दोन वर्षांनंतर, 1998साली दाऊद देखील मुंबई सोडून दुबईला गेला. पण घडलं असं की एके दिवशी गवळीचा मित्र रामा नाईक एका टोळीयुद्धात मारला गेला. मित्राच्या मृत्यूमुळे सूडाच्या आगीत पेटलेल्या अरुण गवळीने स्वतःची गँग तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि तिथूनच दाऊद आणि गवळीमधील दुश्मनीचा काळ सुरू झाला. यानंतर, गवळीने गुन्हेगारीच्या जगात कधीही मागे वळून पाहिले नाही. खरं तर, गवळीचे घर देखील अशा ठिकाणी होते जे 1980 आणि 90 च्या दशकात गुंड कारवायांसाठी कुप्रसिद्ध होते, ते ठिकाण म्हणजे भयाकळा स्लम एरिआ.पाहता पहात गवळी हा गुन्हेगारी साम्राज्याचा राजा बनला. त्याचे चाहते त्याला डॅडी म्हणू लागले.