
Arun Gawli wife Asha Gawli: तब्बल 17 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर मुंबईचे डॅडी म्हणजे गँगस्टर अरुण गवळी यांची सुटका झाली आहे. अरुण गवळी यांच्या सुटकेनंतर कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर अरुण गवळी यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी अपूर्ण पाहिलेलं स्वप्न आणि पुढील आयुष्य कसं हवं आहे… याबद्दल सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, अरुण गवळी यांच्या पत्नीचं नाव आशा गवळी आहे… त्यांना लोकं मम्मी म्हणून देखील ओळतात..
आशा गवळी म्हणाल्या, मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे… माझे पतीदेव… माझ्या गवळी साहेबांसाठी… माझं सर्वस्व त्यांच्यासाठी राहिलेलं आहे. काही स्वप्न पूर्ण झालेली नाहीत. आता एकच इच्छा आहे, आमचं वय झालं झालं आहे… वयानुसार आता आमचा काळ उतरता आहे… त्यामुळे काही दिवस असे हवेत, संपूर्ण कुटुंब एकत्र आणि देवाच्या भक्तीत काही दिवस घालवायचे आहेत.. एवढीच एक इच्छा पूर्ण झाली पहिजे… असं अरुण गवळी यांच्या पत्नी म्हणाल्या.
आशा गवळी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ज्या माणसाला प्रत्येक जण घाबरतो त्या माणसावर त्यांनी प्रेम केलं आणि त्यांचं नातं लग्नापर्यंत नेलं… एक मुस्लिम कुटुंबातील मुलगी अरुण गवळी यांच्या प्रेमात पडते. प्रेमासाठी स्वतःचा धर्म बदलते आणि ‘दगडी चाळी’ची मम्मी होते… आज तब्बल 17 वर्षांनंतर अरुण गवळी पुन्हा घरी आल्यामुळे आशा गवळी यांना प्रचंड आनंद झाला आहे.
17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर, सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2007 च्या कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर केला. गणेशोत्सवादरम्यान भायखळ्याला परतलेल्या गवळीचे फुलांनी आणि उत्साहाने स्वागत करण्यात आले.
अरुण गवळी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. 80 दशकात त्यांनी दगडी चाळीतून गुन्हेगारी विश्वात पाय ठेवला… सुरुवातील अरुण गवळी यांनी रामा नाईक याच्या गँगसोबत काम करण्यास सुरुवात केली.
1988 मध्ये अरुण गवळी यांचे मित्र आणि गँग लिडल रामा नाईक यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यामध्ये शत्रूत्व निर्माण झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे 1992 मध्ये, गवळीच्या माणसांवर दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकर याची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला.