AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल फसली… तरीही मुंबईचा डॉन… नंतर रॉबिनहूड… एका गँगस्टरची ही कहाणी माहीत आहे काय?

शस्त्रास्त्रांची तस्करी, खंडणी, मर्डर... सिंगर फासली तरीही 'हा' मुंबईचा डॉन, माहिती आहे का गँगस्टरची कहाणी... अनेक वर्ष त्याने भोगला तुरुंगवास, सुटका झाल्यानंतर...

सिंगल फसली... तरीही मुंबईचा डॉन... नंतर रॉबिनहूड... एका गँगस्टरची ही कहाणी माहीत आहे काय?
फाईल फोटो
| Updated on: Sep 05, 2025 | 2:36 PM
Share

मुंबईच्या अंडरवर्ल्डची चर्चा सुरु झाल्यानंतर अनेक गँगस्टरची नावे समोर येतात. यामधील एक सर्वात मोठं नाव म्हणजे अरुण गवळी यांचं… त्यांना प्रत्येक मुंबईकर आज प्रेमात डॅडी बोलतो… 17 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर अरुण गवळी यांची सुटका झाली आणि ते पुन्हा भायखाळा येथील दगडी चाळीत पोहोचले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरुण गवळी यांची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तुरुंगातून बाहेर आल्याचे त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

दगडी चाळीतून सुरु झाला अरुण गवळी यांचा प्रवास

अरुण गवळी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पण 80 दशकात त्यांनी दगडी चाळीतून गुन्हेगारी विश्वात पाय ठेवला… सुरुवातील अरुण गवळी यांनी रामा नाईक याच्या गँगसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यापर्यंत अरुण गवळी यांची ओळख वाढली. त्यावेळी त्यांचं काम शस्त्रास्त्रांची तस्करी आणि खंडणीशी संबंधित होतं.

पण दाऊद याच्यासोबत असलेली अरुण गवळी यांची मैत्री फार काळ टिकली नाही. 1988 मध्ये अरुण गवळी यांचे मित्र आणि गँग लिडल रामा नाईक यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यामध्ये शत्रूत्व निर्माण झालं. त्यानंतर 1992 मध्ये, गवळीच्या माणसांवर दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकर याची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला.

राजकारणात प्रवेश…

गुन्हेगारी विश्वात आपला नाव मोठं केल्यानंतर अरुण गवळी यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी सेना या नावाने पक्ष स्थापन केला आणि मुंबई येथील चिंचपोकळी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले… त्यांनी स्थानिक लोकांचं देखील समर्थन मिळालं. अनेक जण त्यांना ‘रॉबिनहुड’ म्हणून सुद्धा ओळखू लागले होते.

हत्या आणि शिक्षा…

2008 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसेकर यांच्या हत्येने अरुण गवळी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते.

आता 17 वर्षांनंतर अरुण गवळी यांनी जामीन मंजूर झाला आहे आणि ते नागपूर तुरुंगातून बाहेर आले आहेत. ते मुंबईत परतल्यावर दांगडी चाळ येथे त्यांचं हिरोसारखं स्वागत करण्यात आलं. पण , पोलिस अजूनही त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अरुण गवळी पुन्हा राजकारणात परतणार की शांत जीवन जगणार? त्यांच्या सुटकेमुळे मुंबईला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या कहाण्या आठवल्या आहेत.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.