AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे महापालिकेत मेगाभरती, कधीपासून भरता येणार अर्ज? कोणत्या विभागात किती पदे? जाणून घ्या A टू Z माहिती

ठाणे महानगरपालिकेतील १७७३ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून एप्रिल २०२६ पासून ही प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होणार आहे. आरोग्य, अग्निशमन आणि तांत्रिक विभागातील या मेगाभरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

ठाणे महापालिकेत मेगाभरती, कधीपासून भरता येणार अर्ज? कोणत्या विभागात किती पदे? जाणून घ्या A टू Z माहिती
Thane Municipal Corporation
| Updated on: Mar 17, 2026 | 9:14 AM
Share

ठाणे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडथळे आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून रेंगाळलेल्या १७७३ पदांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचे स्पष्ट संकेत पालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत.

भरती रखडण्याचे मुख्य कारण काय?

ठाणे महापालिकेने ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील १७७३ रिक्त पदांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. त्यामुळे संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली. यामुळे भरती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला होता. याशिवाय, आरक्षणाचे काही तांत्रिक मुद्दे आणि रिक्त पदांच्या सुधारित आराखड्यामुळे ही प्रक्रिया तब्बल सहा महिने लांबणीवर पडली होती. आता हे सर्व तांत्रिक पेच सुटले असून पालिका प्रशासनाने भरतीची फाईल पुन्हा एकदा सक्रिय केली आहे.

कोणत्या विभागांत आणि किती पदे भरली जाणार?

या मेगाभरतीमध्ये सर्वाधिक भर हा पालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर देण्यात आला आहे. यामध्ये मुख्यत्वे खालील विभागांचा समावेश असणार आहे. यात आरोग्य विभागात डॉक्टर्स, परिचारिका (Nurses), लॅब टेक्निशियन आणि वॉर्ड बॉय यांसारख्या पदांची मोठी संख्या आहे. त्यापाठोपाठ शहराच्या वाढत्या विस्तारानुसार अग्निशमन दलात जवानांची कमतरता भासत होती. त्यामुळे अग्निशमन विभागात भरती केली जाणार आहे. तसेच ‘क’ वर्गातील लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) आणि ‘ड’ वर्गातील शिपाई व सफाई कामगारांची पदे भरली जातील. तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि इतर तांत्रिक सहाय्यकांची पदेही यामध्ये समाविष्ट आहेत.

पदाचे नाव एकूण पदे पदाचे नाव एकूण पदे
परिचारिका (Staff Nurse) ५५७ लिपिक टंकलेखक ५३
फायरमन (अग्निशमन) ३८९ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २८
प्रसविका (Midwife) ११७ लिपिक लेखा ३२
चालक यंत्रचालक २७७ अटेंडंट २८
कनिष्ठ अभियंता-२ ६३ ईसीजी टेक्निशियन १९
दवाखाना आया ४८ लॅब टेक्निशियन १५
वॉर्ड बॉय ३७ इतर पदे ९३

उमेदवारांसाठी पुढचा टप्पा काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी ऑगस्ट २०२५ मध्ये अर्ज केले होते, त्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे. या पारदर्शकतेसाठी नामांकित संस्थेकडे याची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हे आहेत. या भरतीमुळे ठाणे पालिकेच्या रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत होईलच, शिवाय आरोग्य आणि आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होतील. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या भरतीला गती मिळाल्याने ठाण्यातील तरुण वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं