AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊदच्या बहिणीला विधवा करणारा ‘तो’ गँगस्टर कोण? ज्याला प्रत्येक मुंबईकर लाडाने म्हणतो…

मुंबईवर दहशत गाजवणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीला विधवा करणारा 'तो' गँगस्टर कोण? अनेक वर्ष भोगला तुरुंगवास, ज्याला आज प्रत्येक मुंबईकर लाडाने म्हणतो..., सर्वत्र डॉनची चर्चा...

दाऊदच्या बहिणीला विधवा करणारा 'तो' गँगस्टर कोण? ज्याला प्रत्येक मुंबईकर लाडाने म्हणतो...
फाईल फोटो
| Updated on: Sep 05, 2025 | 12:21 PM
Share

Don Arun Gawli : एक काळ असा होता जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी यांची दहशत होती. अरुण गवळी यांनी प्रत्येक मुंबईकर लाडाने डॅडी म्हणतो… मुंबईच्या दगडी चाळीत राहणाऱ्या अरूण गवळी यांची नुकताच तुरुंगातून सुटका झाली आहे. 17 वर्षांच्या तुरुंगवासा भोगल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर गवळी पुन्हा बाहेर आले आहे. पण तुम्हाला अरुण गवळीच्या गुन्हेगारी कुंडलीबद्दल माहिती आहे का? तर आजा जाणून घेऊ अरुण गवळी यांच्याबद्दल…

कोण आहेत अरुण गवळी?

‘डॅडी’ या नावाने ओळखले जाणारे अरुण गवळी मुंबई तील भायखाळा येथील दगडी चाळीतील असं एक नाव आहे, ज्या नावाने मुंबईतील अंडरवर्ल्डला हदरवलं होतं. 17 जुलै 1955 मध्ये महाराष्ट्रातील अमहदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे गवळी यांचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील गुलाबराव हे एक मजूर होते. आर्थिक अडचणींमुळे गवळी यांनी मॅट्रिकनंतर शिक्षण सोडलं आणि लहान वयातच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.

दाऊद इब्राहिमसोबत अरुण गवळी यांची मैत्री…

1980 च्या दशकात अरुण गवळी यांनी रामा नाईकच्या गँगसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची ओळख दाऊद इब्राहिम याच्यासोबत झाली आणि त्यानंतर छोटा राजन… तेव्हा दाऊद इब्राहिम याची मुंबईत दहशत होती. गवळीला दाऊदची बेकायदेशीर शस्त्रे आणि ड्रग्जची खेप सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ही मैत्री काही काळ टिकली, परंतु लवकरच हे नातं शत्रुत्वात बदललं.

1988 मध्ये अरुण गवळी यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या रामा नाईक यांची हत्या करण्यात आली. येथूनच दाऊत आणि गवळी यांच्यामध्ये वाग निर्माण झाले. वाद इतके टोकाला गेले की, मुंबईतील अंडरवर्ल्ड चर्चेत राहिलं. अशात, दाऊदला धडा शिकवण्यासाठी गवळी यांनी एक मोठं पाऊल उचललं. 26 जुलै 1992 रोजी गवळीच्या चार शूटरनी दाऊदची मोठी बहीण हसिना पारकरचा पती इब्राहिम पारकर याची मुंबईतील हॉटेलबाहेर गोळ्या घालून हत्या केली. ज्यामुळे दाऊदची बहीण विधवा झाली…

17 वर्ष तुरुंगात होते डॅडी…

3 सप्टेंबर 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2007 च्या एका खून प्रकरणात जामीन मंजूर केला, त्यानंतर 17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आणि ते मुंबईतील दगडी चाळ येथे परतले. 76 वर्षीय गवळीच्या सुटकेच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, वकील आणि समर्थक उपस्थित होते.

किती आहे अरुण गवळी यांची नेटवर्थ?

अरुण गवळी यांची संपत्ती मुख्यतः स्थावर मालमत्ता आहे. 2008 मध्ये त्यांची संपत्ती अंदाजे 250 कोटी इतकी होती. ज्यामध्ये दगडी चाळीसह 11 इमारती आहेत… 2025 मध्ये अरुण गवळी यांची संपत्ती 11 कोटी इतकी होती. 2025 मधील नेमके आकडे उपलब्ध नाहीत, परंतु कुटुंबाची संपत्ती 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं मानलं जात आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान