AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन देणाऱ्या अभिनेत्रीची सावत्र बापाकडून हत्या…

राजेश खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन देणारी 'ती' अभिनेत्री... अभिनेत्रीसोबत कुटुंबातील 5 जणांची सावत्र बापाकडून हत्या... धक्कादायक आहे घटना... अचानक गायब झालेल्या अभिनेत्रीचा मृतदेह सापडला आणि...

राजेश खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन देणाऱ्या अभिनेत्रीची सावत्र बापाकडून हत्या...
फाईल फोटो
| Updated on: Sep 05, 2025 | 9:33 AM
Share

बॉलिवूडचं विश्व बाहेरून पाहायला प्रचंड ग्लॅमरस आणि आकर्षक वाटतं पण आतल्या गोष्टी बाहेर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजते. आता पर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या निधनाचं कारण एका रहस्य आहे.. असंच एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. ही कहाणी आहे बॉलिवूड अभिनेत्री लैला खान हिची… 1978 मध्ये रेश्मा पटेल या नावाने जन्मलेल्या लैला हिने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वफा: अ डेडली लव स्टोरी’ सिनेमात काम केलं होतं. सिनेमात अभिनेते राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. अशात अभिनेत्रीच्या आयुष्यात असं एक वळण आलं जेव्हा तिच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला…

2011 मध्ये करण्यात आली हत्या…

2011 मध्ये अभिनेत्री आयुष्यात एक दुःखद वळण आलं जेव्हा तिच्या कुटुंबातील पाच इतर सदस्यांसह तिची हत्या करण्यात आली. सांगायचं झालं तर, राजेश खन्ना यांच्या सोबतचा तिचा सिनेमा यशस्वी झाला नाही पण या सिनेमाने तिला चांगलंच प्रसिद्धीच्या झोतात आणलं.

राजेश खन्ना यांच्यासोबत ऑनस्क्रिन केमिस्ट्री…

सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली कारण सिनेमात राजेश खन्ना आणि लैला यांचे अनेक बोल्ड सीन होते. दोघांच्या वयात देखील 28 वर्षांचं अंदर होतं. तेव्हा राजेश खन्ना यांचं वय 60 पेक्षा जास्त होतं, तर लैला हिचं वय जवळपास 20 वर्ष होतं. त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीने चाहत्यांना देखील चकित केलं… सिनेमात अनेक बोल्ड सीन होते.

अचानक गायब झाली अभिनेत्री…

राजेश खन्ना यांच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. पण त्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये अभिनेत्रीचा सहभाग असल्याची माहिती देखील आली. रिपोर्टनुसार, लैला आणि तिचं कुटुंब दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या लोकांशी संपर्कात असल्याचं आढळल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील खळबळ माजली होती.

लैला हिच्या कुटुंबियांची हत्या…

याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं तेव्हा वळण घेतलं जेव्हा 2011 मध्ये लैला आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे तिचा सावत्र वडील परवेझ टाक असल्याचं तपासात उघड झालं. चौकशीदरम्यान टाकने मालमत्तेच्या वादातून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, परवेझ हे लैला हिच्या आईचे तिसरे पती होते. 2024 मध्ये परवेझ याला कोर्टाने दोषी ठरवलं आणि त्याला भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.