बायकोचा घटस्फोटाला नकार, नवऱ्याने 3 दिवस पाठलाग केला आणि सर्व खेळ संपला… धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
लेक 13 वर्षांची असतानात बायकोवर घटस्फोटाचा दबाव... नवऱ्याने तीन दिवस बायकोचा पाठलाग केलं आणि सर्वकाही संपवलं... धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद... या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे..

आयुष्यात कोण कधी काय करेल काहीही सांगता येत नाही… उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथील एक नवऱ्याने बायकोची हत्या केली आहे. गोळी मारुन नवऱ्याने बायकोचं आयुष्य संपवलं आहे. घटना घडल्यानंतर नवऱ्याने घटना स्थळाहून पळ काढला नाही. अखेर पोलिसांना अरोपीला अटक केली आहे… बायको घटस्फोट देत नसल्यामुळे त्याने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दोघांचं 15 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांना एक 13 वर्षांची मुलगी देखील आहे. आईची हत्या झाल्यानंतर मुलीनेच वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
आरोपीने सांगितलं, की त्याच्या बायकोला तो आवडत नव्हता. 14 महिन्यांपूर्वी दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्याची पत्नी मुलीसोबत वेगळी राहत होती. जेव्हा जेव्हा कोर्टाची तारीख निश्चित व्हायची तेव्हा तो यायचा पण पत्नी कोर्टात येत नव्हती… म्हणून आरोप नाराज होता. त्याला परदेशात जाऊन नोकरी करायची होती पण घटस्फोटाची केस सुरु असल्यामुळे तो परदेशात जाऊ शकत नव्हता..

घटना बुधवारी रात्री 8 वाजता घडली. जेव्हा पत्नी कामावरून घरी येत असताना एका दुकात गेली. दुकानातून बाहेर आल्यानंतर आरोपीना पत्नीवर गोळी झाली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
का व्हायचे दोघांमध्ये वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, जेल रोड निवासी विश्वकर्मा चौहान याचं लग्न 15 वर्षांपूर्वी 35 वर्षीय ममता चौहान हिच्यासोबत लग्न केलं. . कुटुंबाने सांगितल्यानुसार, सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. त्यांना एक मुलगी होती. पण कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला. लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. दोघेही एकमेकांवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत असत. 14 महिन्यांपूर्वी ममता तिच्या 13 वर्षांच्या मुलीसह शाहपूरच्या गीता वाटिका भागात राहायला गेली आणि भाड्याच्या घरात राहू लागली. ती एका खाजगी कंपनीत काम करत होती.
पत्नीवर लावले गंभीर आरोप…
दोघांचा घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ममता न्यायालयात गेली नव्हती. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये खूप भांडणं व्हायची. पतीने आरोप केला की पत्नीला त्याच्याकडून पोटगी हवी होती. पण तो तिला पैसे देऊ इच्छित नव्हता. म्हणून ममता कोर्टात यायची… पतीने आरोप केला आहे की पत्नी त्याच्यावर शेती विकण्यासाठी दबाव टाकत होती. ती त्याच्याकडून वारंवार पैसे मागत होती. त्याला या गोष्टीचा कंटाळा आला होता. त्याने तीन दिवस पत्नीचा पाठलाग केला आणि तिची गोळ्या झाडून हत्या केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.
