AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe Death: तुझा वेडा हट्ट होता वेडे म्हणून…, प्रिया मराठेच्या निधनानंतर जवळच्या व्यक्तीची हृदयस्पर्शी पोस्ट

Priya Marathe Death: मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं. अभिनेत्रीने वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं यावरल कोणाला विश्वास देखील बसलेला नाही... अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत...

Priya Marathe Death: तुझा वेडा हट्ट होता वेडे म्हणून..., प्रिया मराठेच्या निधनानंतर जवळच्या व्यक्तीची हृदयस्पर्शी पोस्ट
फाईल फोटो
| Updated on: Sep 02, 2025 | 4:10 PM
Share

Priya Marathe Death: अभिनेत्री प्रिया मराठे हिने वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे अभिनेत्रीचं निधन झालं. प्रिया हिच्या निधनानंतर सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया हिच्यासोबत असलेल्या आठवणी शेअर केल्या आहे. प्रिया हिच्यासोबत घालवलेले क्षण, एकत्र शेअर केलेल्या भावना, हसणं, रडणं… सर्वकाही अनेकांच्या डोळ्यासमोर सतत येत आहे. अनेक सेलिब्रिटींनंतर अभिनेत्री राजश्री निकम हिने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रिया हिच्या झालेल्या शेवटच्या भेटीचा फोटो देखील राजश्री हिने शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत राजश्री म्हणाली, अंग वेडे…. गेल्या वर्षी तु बरी झाल्यावर आपण तुझ्या घरी भेटलो. तेव्हाचा हा फोटो. तु, मी, वॅन्डीने खुप गप्पा मारल्या, पोट दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकींना मिठी मारून रडलो… आणि तु म्हणाली होतीस now no looking back . वेडी…. My brave वेडी…. Group मध्ये आपण एकमेकांना वेडे म्हणतो.

त्या दिवशी ही वेडेपणा केला आपण. रात्री तू आम्हाला see off करायला खाली आलीस.. आणि समोरून लग्नाची वरात जात होती. आपण दोघींनी एकमेकींना नजरेने खुणवुनच विचारल करायचा का वेडेपणा? वॅन्डी नको नको म्हणत असताना आपण दोघी त्या music वर जवळ जवळ १५ मिनिट रस्त्यावर मनसोक्त नाचलो… यार…. वॅन्डीने video करायला हवा होता…. तो दिवस होता 30 January 2024. नंतर भेटलोच नाही. केवळ तुझ्या हट्टापायी.

न भेटणं हा तुझा वेडा हट्ट होता वेडे… आज इच्छा असूनही तुला भेटायला येता येत नाही वाईत shooting करत असल्यामुळे, बघितलस म्हणून असे वेडे हट्ट करू नये वेडे… प्रियाऽऽऽऽऽऽऽऽ Love you वेडे…, सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने कर्करोगावर मात देखील केली. पण पुन्हा तिची प्रकृती खालावली… ‘तुझेच मी गीत गात आहे’ या माहिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. पण मालिका सुरु असताना प्रियाला कर्करोगाचं निदान झालं आणि प्रियाने मालिकेतून ब्रेक घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा