शिवदीप लांडेंची ठाणे एटीएस कार्यालयात दोन तास चर्चा, तर वाझेंच्या ATS ताब्याबाबत कोर्टात सुनावणी

| Updated on: Mar 19, 2021 | 3:33 PM

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. (Shivdeep Lande Sachin Vaze)

शिवदीप लांडेंची ठाणे एटीएस कार्यालयात दोन तास चर्चा, तर वाझेंच्या ATS ताब्याबाबत कोर्टात सुनावणी
शिवदीप लांडे ठाणे एटीएस कार्यालयात
Follow us on

ठाणे : दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा ठाणे एटीएस कार्यालयात आले होते. यावेळी शिवदीप लांडे आणि डीसीपी राजकुमार शिंदे यांच्यात बैठक झाली. शिवदीप लांडे यांनी एटीएस अधिकाऱ्यांसोबत सुमारे दोन तास चर्चा केली. (ATS DIG Shivdeep Lande at Thane ATS Office Thane Court Hearing on Sachin Vaze ATS Custody in Mansukh Hiren Death Case)

पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. मनसुख हिरेन यांचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांची टीम आणि इतर अधिकाऱ्यांची दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे. कालच मीरा भाईंदर क्षेत्राचे डीसीपी डॉ. महेश पाटील हेही एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून गेले.

सचिन वाझेंचा ताबा एटीएसकडे जाणार?

ठाणे कोर्टात सचिन वाझे प्रकरणाची सुनावणी असून एटीएसकडून वाझेंचा ताबा मागितला जाण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी यापूर्वी रेती बंदर भागातील खाडीत मनसुख हिरेन यांच्या डमी पुतळ्याचे नाट्य रुपांतरण केले होते. त्यानंतर सोमवारीही त्यांनी एटीएस कार्यालयात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं.

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप वामनराव लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत
बिहार कॅडरचे अधिकारी असलेले लांडे ह सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत
अकोला जिल्ह्यातील परसा गावात शेतकऱ्याच्या पोटी शिवदीप लांडे यांचा जन्म
शिक्षणात हुशार, शिष्यवृत्ती मिळवून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण
मुंबईत यूपीएससीचे शिक्षण, बिहार कॅडरमध्ये आयपीएस म्हणून निवड
बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त जमालपूरमध्ये पहिल्यांदा पोस्टिंग
पाटणाचे एसपी म्हणून वेगळ्या शैलीमुळे देशभरात प्रसिद्ध
शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई
44 वर्षीय शिवदीप लांडे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक

(ATS DIG Shivdeep Lande at Thane ATS Office Thane Court Hearing on Sachin Vaze ATS Custody in Mansukh Hiren Death Case)

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही NIA कडे?

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत आहे.

संबंधित बातम्या :

तीन कारणं, ज्यामुळे अनिल देशमुखांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता!

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाची पवारांकडून माहिती, दिल्लीतील भेटीचे तपशील गृहमंत्र्यांनी सांगितले

(ATS DIG Shivdeep Lande at Thane ATS Office Thane Court Hearing on Sachin Vaze ATS Custody in Mansukh Hiren Death Case)