AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani bomb scare : चार कारणं, ज्यामुळे अनिल देशमुखांची उचलबांगडी जवळपास निश्चित!

Parambir Singh letter : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे.

Ambani bomb scare : चार कारणं, ज्यामुळे अनिल देशमुखांची उचलबांगडी जवळपास निश्चित!
परमबीर सिंग, अनिल देशमुख
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 20, 2021 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली : मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण (Mukesh Ambani bomb scare) आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात (Mansukh Hiren) बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्यावरच टांगती तलवार आहे. त्यातच परमबीर सिंग यांनी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA ने अटक केल्यानंतर मोठमोठे खुलासे होत आहेत. त्यामुळे गृहखातं बदनाम होत असल्याची भावना आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर हटवण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांनी काल शुक्रवारी 19 मार्चला दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Anil Deshmukh may remove as Maharashtra Home Minister in Mukesh Ambani bomb scare case sachin vaze)

शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय झालं हे अनिल देशमुखांनी पत्रकारांना सांगितलं. देशमुख म्हणाले, ”  मी सकाळी दिल्लीत आलो होतो. नागपुरातील मिहान प्रकल्प आहे. त्यामध्ये मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात येण्याचा विचार आहे. या इंडस्ट्री तिकडे आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांना साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांची माहिती घेतली. एनआयए आणि एटीएस सर्व तपास करत आहेत. त्यांना सर्व मदत राज्य शासनाची आहे. जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई राज्य शासन करेल.”

अनिल देशमुखांवर टांगती तलवार

एकीकडे अनिल देशमुख मिहान प्रकल्पाबाबत जरी सांगत असले तरी, खुद्द शरद पवारांच्या भेटीसाठी ते दिल्लीत पोहोचले, यावरुन सध्याच्या राजकीय घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. सचिन वाझेप्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे.

शरद पवार नाराज?

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभारावर शरद पवार नाराज आहेत. अनिल देशमुखांचा खात्यावर वचक नाही, ते गृहखातं हाताळू शकत नाहीत, अशी भावना आहे. त्यामुळे शरद पवारांनी अनिल देशमुखांना दिल्लीत पाचारण केल्याचं सांगण्यात येत आहेत.

चार कारणांमुळे अनिल देशमुख बॅकफूटवर

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर असलं तरी गृहखातं बदनामीच्या केंद्रस्थानी आहे. सचिन वाझे यांना शिवसेना वाचवत असल्याचा आरोप होत आहे. मात्र गृहखातं हे राष्ट्रवादीकडे असल्याने या खात्याकडेही बोट दाखवलं जात आहे.

चार कारणे 

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांचं नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृहखात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवारांची आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. हे दुसरं कारण आहे, ज्यामुळे अनिल देशमुखांवर टांगती तलवार आहे.

तिसरं म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे याप्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्याशिवाय चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांचं मनोधैर्य खचल्याचं दिसत असल्याने, मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृहखात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्या हे खातं सोपवलं जाऊ शकतं.

VIDEO : अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शरद पवार-अनिल देशमुखांची दिल्लीत भेट, राजकीय परिस्थितीवर चर्चा

(Anil Deshmukh may remove as Maharashtra Home Minister in Mukesh Ambani bomb scare case sachin vaze)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...