Aurangabad | टीव्हीचा आवाज मोठा करून खोलीत प्रेमी युगुलाची आत्महत्या, औरंगाबादच्या हॉटेलमधील घटनेनं खळबळ

| Updated on: Aug 04, 2022 | 10:34 AM

दोघांचेही प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबियांना नव्हती, असे पोलिसांना सांगण्यात आले. सागर बीएच्या दुसऱ्या वर्षात तर सपना बारावीत शिकत होती.

Aurangabad | टीव्हीचा आवाज मोठा करून खोलीत प्रेमी युगुलाची आत्महत्या, औरंगाबादच्या हॉटेलमधील घटनेनं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगाबादमध्ये एका प्रेमी युगुलानं (Lover couple) हॉटेलच्या खोलीत आत्महत्या (Suicide) केल्यानं खळबळ माजली आहे. या दोघांनीही शहरातील (Aurangabad city) एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. गंभीर बाब म्हणजे आत्महत्या करताना या दोघांनीही आपला आवाज इतरांना येऊ नये म्हणून आधी खोलीचा दरवाजा आतून लावला. टीव्हीचा आवाज मोठा केला आणि त्यानंतर गळफास घेतला. आणखी गंभीर म्हणजे तीनन दिवस प्रेमी युगुलाचे मृतदेह हॉटेलच्या खोलीतच पडून होते. खोलीबाहेर दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सदर बाब व्यवस्थापकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना सदर माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या दोघांपैकी एकाकडेच मोबाइल होता. तोदेखील त्याने एअरोप्लेन मोडवर टाकला होता. त्यामुळे या तीन दिवसात कोणीही त्यांना संपर्क करू शकले नाही.

कुठे घडला प्रकार?

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील द ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये सदर घटना घडली. या रुममध्ये प्रियकराने गळफास घेतला तर प्रेयसीने विष प्रशान करून आत्महत्या केल्याचं मंगळवारी उघडकीस आलं. या प्रकरणी वेदांत नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सागर राजेश बावणे आणि सपना अंकुश खंदारे असं आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीचं नावं आहे. सागर बावणे याने 29 जुलै रोजी रेल्वे स्टेशन रोडवरील ग्रेट पंजाब हॉटेलमधील एक रुम बुक केली होती. या रुममध्ये सपनादेखील दाखल झाली दोघांचेही आधर कार्ड हॉचेल चालकांनी घेतले होते. रुममध्ये गेल्यानंतर दोघांनी कोणतीही ऑर्डर व्यवस्थापनाकडे केली नाही. त्यानंतर ते दोघे बाहेर देखील आले नाही..

तीन दिवसानंतर प्रकार उघडकीस

29 जुलै रोजी रुममध्ये गेल्यानंतर हे दोघे बाहेर आलेच नाहीत. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वच्छता कर्मचारी रुमच्या बाहेर झाडू मारत होते. तेव्हा त्यांना खोलीतून दुर्गंधी आली. कर्मचाऱ्याने दरवाजा वाजवला. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कर्मचाऱ्याने हॉटेल व्यवस्थापकाला सदर प्रकाराची माहिती दिली. व्यवस्थापकांनी वेदांत नगर पोलिसांना तत्काळ बोलावून घेतलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. सागरने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइल फ्लाइट मोडवर टाकला होता. तर सपनाने तिचा मोबाइल घरीच ठेवला होता. पोलिसांनी सागरच्या मोबाइलचा फ्लाइट मोड काढल, त्यानंतर मोबाइलमधील पहिल्या क्रमांकाल फोन केल्यास त्याच्या लहान भावाला फोन लागला. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांना सदर धक्कादायक घटनेची माहिती देण्यात आली. दोघांचेही प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबियांना नव्हती, असे पोलिसांना सांगण्यात आले. सागर बीएच्या दुसऱ्या वर्षात तर सपना बारावीत शिकत होती.