AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी जगभरात प्रसिद्ध झालो…बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यामुळे बिग बी देत होते मृत्यूशी झुंज, काय घडलेलं?

Bollywood Actor On Amitabh Bachchan : 'महाभारत' फेम अभिनेत्यामुळे अमिताभ बच्चन मृत्यूशी झुंज देत होते. याबद्दल अभिनेत्यानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.

मी जगभरात प्रसिद्ध झालो...बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यामुळे बिग बी देत होते मृत्यूशी झुंज, काय घडलेलं?
| Updated on: Oct 29, 2026 | 9:26 PM
Share

बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराचं आयुष्य एका क्षणात बदलू शकतं, याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग अभिनेता पुनीत इस्सर यांच्या आयुष्यात घडला. १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर पुनीत इस्सर यांच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. त्यांना तब्बल सहा वर्षे काम मिळालं नाही. मात्र, पुढे ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील दुर्योधनाच्या भूमिकेनं त्यांना घराघरांत ओळख मिळवून दिली.

‘कुली’च्या सेटवर नेमकं काय घडलं होतं?

१९८२ मध्ये दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. बंगळुरूमध्ये चित्रपटातील एका फाइट सीनचं शूटिंग सुरू असताना पुनीत इस्सर आणि अमिताभ बच्चन यांच्यातील एका सीनदरम्यान अपघात घडला. पुनीत यांचा बुक्का चुकून अमिताभ बच्चन यांना जोरात लागला. या अपघातात अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांची प्रकृती इतकी खालावली होती की, काही काळासाठी त्यांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आल्याचं त्यांनी स्वतः आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं होतं. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जवळपास दोन महिने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांनी मृत्यूवर मात केली. या घटनेनं संपूर्ण देशाला धक्का बसला होता. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत होते.

अपघातानंतर पुनीत इस्सर यांना सहा वर्षे काम मिळालं नाही

या दुर्घटनेचा परिणाम केवळ अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यावरच नव्हे, तर पुनीत इस्सर यांच्या कारकिर्दीवरही झाला. अलीकडेच एका मुलाखतीत पुनीत यांनी त्या कठीण काळातील अनुभव सांगितला. पुनीत म्हणाले की, ‘जे काही घडतं, ते चांगल्यासाठीच घडतं, यावर माझा ठाम विश्वास आहे. दुर्दैवाने तो अपघात घडला. त्यानंतर मला सहा वर्षे काम मिळालं नाही. मात्र, मी जगभरात प्रसिद्ध झालो. लोक मला अमिताभ बच्चन यांचा जीव घेता घेता राहिलेला माणूस म्हणून ओळखू लागले. तो केवळ एक अपघात होता. मी मुद्दामहून असं काहीही केलं नव्हतं. अमितजी हे सुपरस्टार आहेत आणि मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. त्या अपघातानंतरची सहा वर्षे माझ्यासाठी खूप कठीण होती. मला पाहिजे तशा भूमिका मिळत नव्हत्या. काही चित्रपटांमधूनही मला काढून टाकण्यात आलं. मात्र, यासाठी मी कोणालाही दोष देत नाही. ते माझं नशीब होतं. या सगळ्या परिस्थितीमुळे मी अधिक खंबीर झालो.’

‘मला ‘महाभारत’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दुष्ट दुर्योधन म्हणून ओळखला जाऊ लागलो. खरं तर, मला दुर्योधनाचीच भूमिका साकारायची होती. बी. आर. चोप्रा सरांना मात्र मला भीमाची भूमिका द्यायची होती. मी दुर्योधनाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देऊ इच्छितो, असं जेव्हा मी त्यांना सांगितलं, तेव्हा ते आणि त्यांचे सहकारी आश्चर्यचकित झाले. मात्र, मी दुर्योधनाचीच भूमिका साकारण्याचा आग्रह धरला. प्रेक्षक या व्यक्तिरेखेशी इतके जोडले गेले की त्यांनी या भूमिकेला खूप चांगला प्रतिसाद दिला.’ असं पुनीत यांनी शेवटी सांगितलं. अमित भाटियाला दिलेल्या मुलाखतीत पुनीत बोलत होते.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं