AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेख हसीना यांच्या पलायनचा व्हिडीओ काढणाऱ्या एअर फोर्स ऑफीसरचा संशयास्पद मृत्यू

आपला मुलगा कधीकधी स्वतःच्या सुरक्षेबद्दल भीती व्यक्त करत असे बांगलादेश हवाई दलाचे माजी अधिकारी तहसीफ सौरी यांच्या वडिलांनी म्हटले आहे.

शेख हसीना यांच्या पलायनचा व्हिडीओ काढणाऱ्या एअर फोर्स ऑफीसरचा संशयास्पद मृत्यू
air force officer tahsif souri found dead
| Updated on: Oct 29, 2026 | 9:11 PM
Share

बांगलादेशाचे माजी वायू सेना अधिकारी के.एम. तहसीफ सौरी यांचा मृतदेह गुरुवारी (29 ऑक्टोबर 2026) ढाका येथील एका नदीत संशयास्पद अवस्थेत सापडले आहे. एक दिवस आधी ते बेपत्ता झाले होते. तहसीफ सौरी हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून जात असताना त्यांच्या पलायनाचा व्हिडीओ तयार केला होता.

‘द डेली स्टार’च्या बातमीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टोंगी बंदर घाट भागात सौरी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेला मोबाईल फोन आणि घड्याळाच्या मदतीने त्यांची ओळख पटली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी शहीद सुहरावर्दी मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मुलगा म्हणायचा भीती वाटते….

तहसीफ सौरी हे त्यांच्या कुटुंबासोबत उत्तरा येथील सेक्टर १८ मध्ये रहात होते. पोलिस अधिकाऱ्याच्या मतानुसार मृत्यूचे नेमके कारण अजून समजलेले नाही. मात्र, बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, योग्य कारण पोस्टमार्टेम रिपोर्टआल्यानंतर समजेल असे म्हटले जात आहे. सौरी यांचे वडील केएम इनायतुल करीम हिलाल यांनी सांगितले की त्यांचा मुलगा अनेकदा त्याच्या सुरक्षेवर चिंतेत होता. त्यांनी सांगितले की तहसीफ मला सांगायचा की त्याला थोडी भिती वाटत होती. परंतू त्याने कधी सांगितले नाही की तो का घाबरत आहे.

त्यांनी सांगितले की सौरी याला गैरशिस्तीमुळे वायूसेनेतून बडतर्फ केले होते. त्यानंतर त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड, नेत्रा न्यूज आणि अलिकडे वर्गो टोबॅकोमध्ये काम केले होते. घटनेच्या दिवसाचा उल्लेख करत सौरी याचे वडीलांनी सांगितले की, ‘सायंकाळ होण्याआधी तहसीफ याचा एक ज्युनिअर दोस्त दीप त्याला बोलवण्यासाठी आला होता. तहसीफ त्याच्या आईला सांगून खाली गेला होता की तो दीपशी बोलून परत येतो, परंतू त्यानंतर तो घरी परत आला नाही.’

शेख हसीना यांचा ढाका सोडण्याचा व्हिडिओ

तहसीफ सौरी यांच्या मृत्यूने आता सर्वांचे लक्ष्य वेधले आहे कारण त्याचे नाव माजी पीएम शेख हसीना यांचा देश सोडण्याच्या व्हिडिओशी जोडलेले होते. ५ ऑगस्ट २०२४ रोजी जनतेच्या विरोधानंतर शेख हसीना यांचे सरकार कोसळले आणि त्यांना ढाका सोडावे लागले होते. हसीना सैन्य दलाच्या हॅलिकॉप्टरने रवाना झाल्या होत्या.बांगलादेश वायू सेनेच्या C-130J हरक्यूलिस विमानाने त्या हिंडन एअरबेसला पोहचल्या होत्या. शेख हसीना सध्या भारतात निर्वासिताचे जीवन जगत आहेत. मात्र, पोलिसांचे म्हणणे आहे की सौरी याचा मृत्यू आणि त्यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ यात सध्या कोणताही संबंध प्रस्थापित झालेला नाही.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं