AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसातून किती कप कॉफी पिणं सुरक्षित? प्रमाणापेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Coffee Side Effects: बऱ्याच लोकांना थकवा घालवण्यासाठी सतत कॉफी प्यायची सवय असते. दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या अति कॉफी पिण्याचे दुष्परिणाम आणि किती कप कॉफी पिणे योग्य आहे.

दिवसातून किती कप कॉफी पिणं सुरक्षित? प्रमाणापेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
drinksImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Oct 29, 2026 | 8:53 PM
Share

सकाळी उठल्यानंतर झोप उडवण्यासाठी असो किंवा दिवसभराच्या कामाचा थकवा दूर करण्यासाठी, अनेकांना कॉफी प्यायला आवडते. कॉफीचा एक घोट घेताच फ्रेश वाटू लागतं आणि काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. काही जणांना कामाच्या धावपळीत वारंवार कॉफी पिण्याची सवय असते. ऑफिसमध्ये काम करताना किंवा थोडासा थकवा जाणवताच ते लगेच कॉफीचा कप हातात घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? यामुळे झोपेच्या समस्या, अस्वस्थता आणि इतर दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे दिवसातून नेमकी किती कप कॉफी प्यावी आणि जास्त कॉफी पिण्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, ते जाणून घ्या.

झोपेची समस्या कॉफी लोकांना जागृत ठेवण्यास आणि सुस्ती दूर ठेवण्यास मदत करते. जास्त कॉफी प्यायल्याने रात्री झोपण्याच्या चक्रात समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे निद्रानाश होऊ शकतो. पोटदुखी अनेकांना त्यांच्या आतड्याची हालचाल सुरळीत होण्यासाठी सकाळी कॉफी प्यायला आवडते. कॉफी गॅस्ट्रिन नावाचे हार्मोन सोडण्यास मदत करते, ज्यामुळे कोलनमधील ॲक्टिव्ही वेगवान होते. जर तुम्ही दिवसातून खूप कप कॉफी पीत असाल तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. ब्लड प्रेशरवर परिणाम दिवसातून खूप जास्त कप कॉफीमुळे तुमच्या रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात. उच्च रक्तदाब तुमच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतो, ज्यामुळे तुमच्या हृदयात रक्त प्रवाह मर्यादित होतो. यामुळे हार्ट स्ट्रोकचा धोका संभवतो.

जास्त थकवा जाणवू शकतो कॉफी प्यायल्यानंतर काही वेळाने तुमची उर्जा वाढू शकते. परंतु जेव्हा कॅफिन शरीरातून काढून टाकले जाते तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, कॅफीनचा प्रभाव कमी झाल्यानंतर कॉफीचा पुन्हा शरीरावर परिणाम होतो आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त थकवा जाणवू शकतो. एंग्जायटीचे कारण बनते कॉफीच्या कमी-मध्यम डोसमुळे सतर्कता वाढू शकते. परंतु ती जास्त प्रमाणात किंवा वारंवार दीर्घ कालावधीसाठी प्यायल्याने एंग्जायटी किंवा चिडचिड होऊ शकते. रिपोर्ट्स नुसार दुपारी २ नंतर कॉफी पिणे टाळले पाहिजे.

एका दिवसात किती कॉफी पिणे योग्य? रिपोर्ट्सनुसार बहुतेक निरोगी प्रौढांसाठी दररोज ४०० मिलीग्राम कॅफिन सुरक्षित मानले जाते. म्हणजे दिवसातून सुमारे चार कप कॉफी पिता येते.

(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं