Chanakya Niti : आयुष्यात या चार लोकांना चुकूनही मदत करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात गरजू लोकांना मदत ही केलीच पाहिजे, परंतु असेही काही लोक असतात, त्यांना कधीही मदत करू नये, अशा लोकांना जर तुम्ही मदत केली तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाने नेहमी गरजू लोकांना मदत ही केलीच पाहिजे. परंतु या समजात असे देखील काही लोक असतात, त्यांना कधीही मदत करू नये, कारण तुम्ही यांना मदत केली तर त्यामुळे तुम्हीच अडचणीमध्ये येण्याची शक्यता असते, तसेच असे लोक तुम्ही केलेल्या मदतीची जाण देखील ठेवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना मदत करणं हे टाळलं पहिजे. समाजात असे अनेक लोक असतात तुम्ही त्यांना कितीही मदत करा ते तुम्हाला धोका देणार म्हणजे देणार, त्यामुळे आपण सर्वात आधी माणसं ओळखायला शिकलं पाहिजे, जे खरे गरजू असतात अशा लोकांना मदत करण्यासाठी कधीही हात आखडता घेऊ नये, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक हे स्वार्थी असतात, अशा लोकांना कधीही मदत केली नाही पाहिजे, कारण असे लोक त्यांचं काम होईपर्यंत चांगूलपणाचा आव आणतात, मात्र एकदा त्यांचं काम झालं की असे लोक तुम्हाला देखील अडचणीत आणण्यासाठी मागे -पुढे पाहत नाही, त्यामुळे असे लोक वेळीच ओळखले पाहिजेत, अशा लोकांची मदत केली नाही पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
अहंकारी लोक – चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात जे लोक अंहकारी असतात, अशा लोकांना देखील कधीही मदत करू नये, कारण असे लोक कधीही तुमच्या मदतीची जाणीव ठेवत नाहीत. त्यामुळे शक्यतो अशा लोकांपासून तुम्हाला जेवढं दूर राहता येतील तेवढं दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.
दृष्ट प्रवृत्तीचे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक मुळातच दृष्ट प्रवृत्तीचे आहेत, जे नेहमी दुसर्यांबद्दल वाईट विचार करतात, अशा लोकांना कधीही मदत केली नाही पाहिजे. कारण असे लोक कधीही तुम्हाला धोका देऊ शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे, तेच तुमच्या हिताचं आहे.
मदतीची जाणीव न ठेवणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक कधीही उपकारांची जाणीव ठेवत नाहीत, अशा लोकांना देखील चुकूनही कधही मदत केली नाही पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
