Aurangabad : पोलिसांनी जबरदस्तीने 1 लाख रुपये घेतल्याचा तरुणाचा आरोप, आत्मदहनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jul 07, 2022 | 9:04 AM

एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात एक तरूण माझी फसवणूक झाल्याचे सांगत आहे. त्याचबरोबर ज्यावेळी तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Aurangabad : पोलिसांनी जबरदस्तीने 1 लाख रुपये घेतल्याचा तरुणाचा आरोप, आत्मदहनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांनी जबरदस्तीने 1 लाख रुपये घेतल्याचा तरुणाचा आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद – औरंगाबादमधील पोलिसांनी (Aurangabad Police) एक लाख रूपये घेतले असल्यामुळे तरूणाने आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून नेमकं काय झालं असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी मारहाण करून एक लाख रूपये घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित तरूणाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच माझी पोलिसांनी फसवणूक केली असल्याचं देखील तो तरूण म्हणत आहे.

औरंगाबादमध्ये व्हिडीओची चर्चा, नेमकं काय झालं असेल ?

एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात एक तरूण माझी फसवणूक झाल्याचे सांगत आहे. त्याचबरोबर ज्यावेळी तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला अनेक पोलिसांनी त्यावेळी पकडण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या तरूणांचं नाव काय हे अद्याप समजलेलं नाही. त्याचबरोबर कोणत्या पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत. हे देखील अद्याप समजलेले नाही. त्यामुळे तरूणाने केलेला आरोप कितपत खरा याची चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस चक्रावले

औरंगाबाद शहरातील पंचवटी चौकात आत्मदहनाचा तरुणाने प्रयत्न केला. त्यावेळी तिथं काही पोलिस कर्मचारी हजर होते. त्यांनी तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला. तरुण ऐकत नसल्याने तुफान धरपकड पाहायला मिळाली. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी तिथं अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला. जिथं आपण एकादी तक्रार द्यायला जातो. तिथचं तरुणाचे पैसे घेतले असल्याचा तरूणाचा आरोप आहे. त्यामुळे चौकशीनंतर हे सगळं प्रकरण बाहेर येईल.