Mumbai Crime : विकृत रिक्षाचालकाची प्रवाशावर जबरदस्ती, अनैसर्गिक सेक्स, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime : दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. आरोपी रिक्षाचालकाने प्रवाशाला जबरदस्तीने रिक्षात बसवलं. त्याला निर्जनस्थळी एका गार्डनमध्ये घेऊन गेला.

Mumbai Crime : विकृत रिक्षाचालकाची प्रवाशावर जबरदस्ती, अनैसर्गिक सेक्स, मुंबईतील धक्कादायक घटना
Rikshaw
Image Credit source: Representative image
| Updated on: Jun 08, 2023 | 2:00 PM

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विकृत रिक्षाचालकाने प्रवाशावर जबरदस्ती केली. त्याच्याबरोबर अनसैर्गिक सेक्स केला. प्रवाशाबरोबर हे सर्व घडलं, त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. रिक्षा भाड्याचे पैसे देण्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. अशी माहिती अधिकाऱ्याने बुधवारी दिली. रिक्षाचालकाने प्रवाशाचा मोबाइल फोन आणि ATM कार्ड काढून घेतलं होतं.

शनिवारी रात्री ही घटना घडली. त्यावेळी दारुच्या नशेत असलेला प्रवाशी घाटकोपर येथून रिक्षात बसला. हा प्रवासी रिक्षा चालाकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवत होता. कुठे जायचय, हे सांगण्याच्या स्थितीमध्ये तो नव्हता.

निर्जनस्थळी एका गार्डनमध्ये नेलं

“तासाभरानंतर पीडित प्रवासी रिक्षातून उतरला. ड्रायव्हरने त्याला भाड्यापोटी 250 रुपये देण्यास सांगितले. प्रवाशाने त्याच्या हातावर 100 रुपये ठेवले. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. आरोपी रिक्षाचालकाने प्रवाशाला जबरदस्तीने रिक्षात बसवलं. त्याला निर्जनस्थळी एका गार्डनमध्ये घेऊन गेला. तिथे त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

पुन्हा ATM मध्ये घेऊन गेला

त्यानंतर ड्रायव्हरने पीडित प्रवाशाला पुन्हा रिक्षात बसवलं व त्याला एटीएम सेंटरमध्ये घेऊन गेला. तिथे त्याला 200 रुपये काढायला लावले. पीडित व्यक्तीचा मोबाइल फोन आणि एटीएम कार्ड काढून घेतलं. त्यानंतरत त्याला तिथून घरी जाऊ दिलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

‘मला लाज वाटतेय’

मंगळवारीपी पीडित पोलीस ठाण्यात गेला. त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मला फक्त माझा मोबाइल फोन हवा आहे. घडलेल्या घटनेमुळे आपल्याला लाज वाटत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं. मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.