AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avinash Bhosale : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक, डीएचएफएल घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

विविध प्रकरणात आधीही अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आली होती. आज अखेर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफएल घोटाळ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Avinash Bhosale : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक, डीएचएफएल घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक, डीएचएफएल घोटाळा प्रकरणात मोठी कारवाईImage Credit source: tv9
| Updated on: May 26, 2022 | 8:48 PM
Share

मुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आलं आहे. विविध प्रकरणात आधीही अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आली होती. आज अखेर त्यांना सीबीआयकडून अटक (CBI) करण्यात आली आहे. डीएचएफएल घोटाळ्यात (DHFL) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हे मूळ प्रकरण 2018 सालातील आहे. त्यावर्षी एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खआत्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता. या प्रकरणी एप्रिलच्या अखेरीस सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणाने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. कारण अविनाश भोसले यांचे राजकीय संबंध असल्याचे बोलले जाते.

काय आहे नेमकं प्रकरण?

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.

कोण आहेत अविनाश भोसले?

  1. अविनाश भोसले हे सुरूवातीला रिक्षाचालकाचे काम करायचे.
  2. भाड्याच्या घरात राहून त्यांनी भाड्याने रिक्षा देण्यास सुरूवात केली.
  3. त्यानंतर बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले.
  4. हजारो कोटींच्या एबीआयएल ग्रुपचे भोसले हेच मालक आहेत.
  5. पुण्यात त्यांची रिअल इस्टेट किंग अशी ओळख आहे.

अविनाश भोसले यांची संपूर्ण कारकिर्द

अविनाश भोसले यांचे राजकीय नेत्यांशीही संबंध

अविनाश भोसले हे फक्त व्यावसायिक नाहीत तर त्यांची राजकीय नेत्यांशी सोयरिकही आहे. कारण अविनाश भोसले हे मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भोसले यांचेही संबंध चांगले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. दिवसभरात इकडे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीचे धाडसत्र सुरू होते. अशात तिकडे अविनाश भोसले यांच्यावरही मोठी कारवाई झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनीच आजचा दिवस चर्चेत राहिला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.