चोरट्यांच्या टार्गेटवर वाईन शॉप, बदलापुरात चोरट्यांचा रात्रीस खेळ चाले!

एका बंगल्यात घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच बेलवली परिसरात एक बियर शॉप आणि एक बार फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलाय.

चोरट्यांच्या टार्गेटवर वाईन शॉप, बदलापुरात चोरट्यांचा रात्रीस खेळ चाले!
बदलापुरात चोरांचा सुळसुळाट
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 6:39 PM

बदलापुरात सध्या चोरट्यांचा रात्रीस खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कारण एका बंगल्यात घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच बेलवली परिसरात एक बियर शॉप आणि एक बार फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलाय. त्यामुळं पोलीस कोमात अन चोरटे जोमात, अशी काहीशी परिस्थिती बदलापूर पश्चिमेत निर्माण झाल्याची चर्चा आहे. बदलापूर पश्चिमेच्या बेलवली परिसरात कृष्णा पॅलेस हा बार आणि रेस्टॉरंट आहे. याचाच बाजूला एक बियर शॉप आहे. या दोन्हीचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. शुक्रवारी १४ जानेवारीच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरट्यांनी हा चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

पोलीस गस्त घालत नल्याचा आरोप

यावेळी चोर चोरी करण्यात अयशस्वी झाले असले तरी चोरीचा हा सगळा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे या चोरांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. हा परिसर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येत असला, तरी या भागात रात्री कधीच पोलीस गस्त घालत नसल्यानं चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळं रात्रपाळीचे पोलीस कोमात, अन चोरटे मात्र जोमात, असं चित्र बदलापुरात पाहायला मिळतंय.

आर्वी गर्भपात प्रकरणात डॉ. कदमला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर रुग्णालयात आढळल्या 71 हजार मुदतबाह्य शासकीय गोळ्या!

सटाण्यात भाजपला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांमध्ये उभी फूट! एका गटासाठी किरण माने हिरो, तर दुसऱ्या गटासाठी झिरो का?