AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्वी गर्भपात प्रकरणात डॉ. कदमला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर रुग्णालयात आढळल्या 71 हजार मुदतबाह्य शासकीय गोळ्या!

न्यायालयाने डॉ. नीरज कदमला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शनिवारी कदम यांच्या रुग्णालयासह घरात जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी या पथकाला मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा सापडलाय. त्यामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

आर्वी गर्भपात प्रकरणात डॉ. कदमला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर रुग्णालयात आढळल्या 71 हजार मुदतबाह्य शासकीय गोळ्या!
आर्वी गर्भपात प्रकरण
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 7:05 PM
Share

वर्धा : आर्वी गर्भपात प्रकरणामुळे (Arvi abortion case) राज्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एखदा चव्हाट्यावर आल्या आहेत. या प्रकरणी आज पहाटे डॉ. नीरज कदमला (Dr. Neeraj Kadam) अटक केली होती. त्यानंतर त्यांना वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात (Wardha District Court) हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शनिवारी कदम यांच्या रुग्णालयासह घरात जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी या पथकाला मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा सापडलाय. त्यामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोग्य विभाग आणि पोलीस पथकाला रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान मालाईन ड्रगचे 23 खोके, त्यात औषधीचे एकूण 2 हजार 563 पॅकेट, असे एकूण 71 हजार 764 गोळ्या आढळळ्या आहेत. तर ऑक्सिटिन नामक 90 इंजेक्शन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. ही सर्व औषधी शासकीय रुग्णालयातील असल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे ही सर्व औषधे मुदतबाह्य असल्याची बाबही समोर आली आहे. शनिवारी सकाळपासून सुरु असलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या दरम्यान रुग्णालयातील ऑपरेशन रजिस्टर, एमटीपी रजिस्टर यासह काही फाईल आणि रजिस्टर जप्त केले आहे. आज पुन्हा याठिकाणी तपासणी केली जाणार आहे.

‘त्या’ खोलीत काय दडलं आहे?

रुग्णालयाच्या वर डॉक्टर कदम यांचे घर असल्याने तेथेही शनिवारी तपासणी करण्यात आलीय. घरातून तपासणीदरम्यान पोलिसांना काळविटाच्या कातडीसह बरेचशे साहित्य मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डॉ. कदम यांच्या आई नागपूर येथे रुग्णालयात दाखल आहेत, तिथे त्यांचे वडील असल्याने घराच्या एका खोलीला टाळे होते. त्या खोलीत काय दडलं आहे हे अद्याप समोर आलं नाही. या गुन्ह्यात सुरवातीला डॉक्टर रेखा कदमसह पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तर मध्यरात्री डॉक्टर नीरज कदम यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.

आर्वीतील आरोग्य विभागही संशयाच्या भोवऱ्यात

दरम्यान, आर्वी गर्भपात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज अटक केलेले डॉ. नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. कदम रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान सरकारी दवाखान्यात वापरण्यात येणारी औषधं कदम रुग्णालयात आढळल्याने आता आर्वी येथील आरोग्य विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

इतर बातम्या :

‘शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण नको, त्यांच्या आदर्शावर चाला’, अरविंद सावंतांचा राणा दाम्पत्याला खोचक सल्ला

Virat Kohli Resigns: विराटच्या राजीनाम्यावर अनुष्काची भावनिक पोस्ट, तुला कशाचाही हव्यास नव्हता, अगदी कर्णधारपदाचादेखील नाही…

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...