तीन महिन्यांचा पगार मागितल्याचा राग, मालकाने तरुणाला जिवंत जाळलं

| Updated on: Dec 27, 2021 | 2:04 PM

पाटण्यात राहणारा विकास राम मोबाईलच्या दुकानात काम करत होता. दुकानाचा मालक आदर्श कुमार आणि कर्मचाऱ्यांनी विकासची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 18 डिसेंबरला ही हत्या झाल्याची माहिती आहे.

तीन महिन्यांचा पगार मागितल्याचा राग, मालकाने तरुणाला जिवंत जाळलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पाटणा : पगार मागितल्याने तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची (Burnt Alive) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे हा प्रकार घडला. मयत तरुण विकास राम हा मोबाईलच्या दुकानात नोकरी करत होता. दोन महिन्यांपासून थकलेलं वेतन घेऊन नोकरी सोडण्याबाबत तरुणाने सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?

पाटण्यातील दानापूर येथील बेऊर पोलीस ठाण्याअंतर्गत सिपारा आयओसी रोडवर ही घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी रास्ता रोको करत गोंधळ घातला आणि मोबाईलच्या दुकानाचीही तोडफोड केली. आरोपीला पकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. चार पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पोलिसी बळाचा वापर करत लाठीचार्ज करुन नागरिकांना हटवण्यात आले, तर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांसोबत पाठवून दिला.

सिपारा भागात राहणाऱ्या रविंद्र राम यांचा मुलगा विकास राम मोबाईलच्या दुकानात काम करत होता. दुकानाचा मालक आदर्श कुमार आणि कर्मचाऱ्यांनी विकासची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 18 डिसेंबरला ही हत्या झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पिता रविंद्र राम यांच्या आरोपानुसार विकास आदर्श कुमारच्या दुकानात नोकरी करायचा. विकासचा दोन-तीन महिन्यांचा पगार झाला नव्हता. थकित पगार द्या, मी नोकरी सोडतो, असं विकास म्हणाला. विकासने पैसे मागितल्यावर आदर्शने त्यालाच पेट्रोल आणायला सांगितलं. विकास पेट्रोल घेऊन आल्यावर मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना विकासला धरायला सांगितलं. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल शिंपडून पेटवून दिलं, असा दावा विकासचे पिता रविंद्र राम यांनी केली आहे.

आरोपींवर कारवाईचं आश्वासन

जळलेल्या अवस्थेत विकासला पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले, मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिकांनी विकासचा मृतदेह सिपारा येथील मोबाईल शॉपजवळ आणून रस्ता जाम केला आणि गोंधळ घातला. तसंच दुकानाचीही तोडफोड करुन जाळपोळ केली. तरुणाला पेट्रोल टाकून जाळत त्याची हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास करुन कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं.

संबंधित बातम्या :

बॉयफ्रेण्डसोबत वाजलं, 14 व्या मजल्यावरुन उडी मारत परदेशी युवतीची आत्महत्या

मूल होत नसल्याने भाचीला पळवलं, मावशीसह नवऱ्यालाही अटक

आधी औषधाचा ओव्हरडोस, मग अपहरणाचा बनाव, 5 महिन्याच्या बाळाला आईनंच संपवलं