
प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हत्यांची सध्या सगळ्या देशात चर्चा आहे. राजा रघुवंशी प्रकरणाचा अजून पूर्णपणे उलगडा झालेला नाही. पत्नी सोनम रघुवंशीच मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात अजूनही नवनवीन खुलासे होत आहेत. या दरम्यान बिहारची राजधानी पाटण्यामध्ये महिलेने प्रियकराची हत्या केल्याच एक प्रकरण समोर आलय. हे सगळं प्रकरण खूपच धक्कादायक आहे. एखाद्या चित्रपटासारखं कथानक आहे. आरोपी महिला विवाहित आहे. तिला तीन मुलं आहेत. घटस्फोट न घेता ती मागच्या 12 वर्षांपासून वेगळी राहत आहे. तिचे दोन युवकांसोबत अनैतिक संबंध होते. पोलिसांनी या प्रकरणात चौकशीच्या आधारावर आरोपी महिला, तिचा पहिला प्रियकर आणि प्रियकराचा मित्र अशी तिघांना अटक केली. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एखाद्या चित्रपटासारखी ही कथा आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये गुडियाच लग्न झालं. लग्नानंतर तिला तीन मुलं झाली. त्यानंतर ती नवऱ्यापासून वेगळी झाली. दुसऱ्याच युवकाच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. त्याचवेळी प्रियकराच्या ड्रायव्हरवर तिची नजर पडली. तिचं ड्रायव्हर बरोबर बोलणं सुरु होतं. हळूहळू ती ड्रायव्हरकडे आकर्षित होऊन त्याच्या प्रेमात पडते. जवळपास आठ वर्ष मालकासोबत अनैतिक संबंध ठेवल्यानंतर त्याच्या ड्रायव्हरसोबत तिचं प्रेम प्रकरण सुरु होतं. हे तिच्या आयुष्यातील तिसरं प्रेम आहे.
दोघांमध्ये शरीरसंबंध आले
ड्रायव्हरसोबत 5 वर्ष तिचं अफेअर चाललं. दोघांमध्ये शरीरसंबंध आले. या दरम्यान ड्रायव्हरने महिलेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. पुढे जाऊन ड्रायव्हर या व्हिडिओचा असा वापर करेल, याचा तिला अंदाज येत नाही. 5 वर्षानंतर ती ड्रायव्हरपासून लांब होण्याचा विचार करते. त्याच्यापासून लांब-लांब राहू लागते.
महिलेच ब्लॅकमेलिंग सुरु होतं
ती ड्रायव्हरकडे दुर्लक्ष करते. त्याने बोलवल्यानंतरही जात नाही. त्यामुळे ड्रायव्हरला राग येतो. ड्रायव्हर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतो. महिलेच ब्लॅकमेलिंग सुरु होतं. या त्रासाला कंटाळलेली महिला तिच्या पहिल्या प्रियकराला म्हणजे ड्रायव्हरच्या मालकाला सांगते. ती त्याच्यासोबत मिळून ड्रायव्हरला मारण्याचा कट रचते.
अशी केली हत्या
पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपी महिलेच नाव गुडिया आहे. तिच्या पहिल्या प्रियकराच नाव विजय आणि तिसरा आरोपी अश्विनी कुमार जो विजयचा मित्र आहे. ड्रायव्हरच नाव सूरज आहे. विजय आणि अश्विनी कुमार सूरजला भेटायला बोलवतात. दोघे त्याला बाइकवर बसवून बाजारात घेऊन गेले. तिथे दोघांनी सूरजला दारु पाजली. त्यानंतर गळा आवळून आणि तीक्ष्ण शस्त्राने त्याची हत्या केली.