AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात ‘या’ दिशेला घड्याळ असेल तर ते काढून टाका, अन्यथा आर्थिक संकटाचा करावा लागेल सामना

चुकीच्या ठिकाणी घड्याळ ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावरही होऊ शकतो. तर घराच्या कोणत्या दिशेला घड्याळ लावावे आणि कोणत्या दिशेला लावू नये हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

घरात 'या' दिशेला घड्याळ असेल तर ते काढून टाका, अन्यथा आर्थिक संकटाचा करावा लागेल सामना
Wall ClockImage Credit source: Freepik
| Edited By: Sanjay patil | Updated on: Dec 23, 2025 | 2:47 AM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार आपण वास्तुशास्त्राला देखील महत्व आहे. घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहावं यासाठी आपल्यापैकी अनेकजण वास्तू शास्त्राची मदत घेतो. आपल्या घरातील काही खास गोष्टींसाठी वास्तूमध्ये खास नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमानुसार आपण घर सजवताना वस्तू ठेवत असतो. जेणे करून घरात सकारात्मक ऊर्जा राहील. तर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात भिंतीवर घड्याळ असते. घड्याळ हे वेळेचे निरीक्षण करण्याचे साधन मानले जात असले तरी, त्याचा घराच्या उर्जेवर आणि वातावरणावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेने घड्याळ ठेवल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. तथापि, चुकीच्या ठिकाणी घड्याळ ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण भिंतीवर घड्याळ ठेवताना कोणते वास्तु नियम लक्षात ठेवले पाहिजेत ते जाणून घेऊयात.

भिंतीवर घड्याळ या दिशेने लावा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला भिंतीवरील घड्याळ लावावे. घड्याळ भिंतीवर लावण्यासाठी या दोन्ही दिशा सर्वात शुभ मानल्या जातात. उत्तर दिशा धनाच्या देवता कुबेराशी संबंधित आहे, तर पूर्व दिशा भगवान सूर्याशी संबंधित आहे. या दिशांना ऊर्जा आणि सकारात्मकतेच्या दिशा मानल्या जातात. या दिशांना घड्याळ ठेवल्याने घरात प्रगती, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

घड्याळ या दिशेने ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावण्यास मनाई आहे. कारण या दिशेला घड्याळ लावल्याले सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखला जातो. तसेच याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर, कौटुंबिक संबंधांवर आणि मानसिक शांतीवर होऊ शकतो. त्यामुळे जीवनात अडथळे आणि ताणतणाव देखील वाढू शकतात.

घड्याळ लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार ड्रॉईंग रूममध्ये पेंडुलम घड्याळ लावावे. तथापि बेडरूममध्ये घड्याळ ठेवताना काळजी घ्यावी. घड्याळ थेट बेडच्या समोर ठेवू नये. शिवाय, घड्याळ थेट डोक्याच्या मागे ठेवू नये. घड्याळाच्या समोर आरसा लावलेला नसावा याची खात्री करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी