BMC ची खोटी नेमणुकीची पत्र देऊन फसवणूक; सांगलीतील दोघांकडून लाखो रुपये उखळले; मुंबईतील दोघांवर गुन्हा

| Updated on: Aug 23, 2022 | 8:51 AM

मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावतो म्हणून आणि मुंबई महानगरपालिकेच्या नावानं खोटी नेमणूक पत्र काढून फसवणाऱ्या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी सांगली, विटा भागाती आणखी कोणाची फसवणूक केली आहे का त्याची चौकशी या दोघांकडून करण्यात येत आहे.

BMC ची खोटी नेमणुकीची पत्र देऊन फसवणूक; सांगलीतील दोघांकडून लाखो रुपये उखळले; मुंबईतील दोघांवर गुन्हा
Follow us on

सांगलीः मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation ) नोकरीला लावतो म्हणून सांगलीच्या विट्यातील दोघांना 6 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रमेश भीमराव कांबळे (रा. फुलेनगर विटा, मुळगाव. मुंबई) आणि कुणाल राजाराम जाधव (रा. डोंबिवली,पश्चिम मुंबई) या दोघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित फसवणूक झालेल्या मुलाचे वडील किरण प्रताप भिंगारदेवे यांच्याकडून विटा पोलिसात (Sangli Vita Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता विटा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून परिसरातील आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत नोकरी देतो असं सांगून फसवणू करणाऱ्या या दोघांनी मुंबई महानगरपालिकेचे नेमणुकीचे पत्रही (Duplicate Appointment Letter) विट्यातील दोघांना देण्यात आले होते, त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

विटा येथील भाजीपाला व्यवसायिक किरण भिंगारदेवे यांचा मुलगा सचिन आणि सूरज भस्मे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून रमेश कांबळेने 22 मार्च 2017 रोजी ते यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत आरटीजीएस रोख तसेच चलनाने कुणाल जाधव याच्या नावावर नोटरी करून प्रत्येकी तीन लाख रुपये असे एकूण 6 लाख रुपये घेतले होते.

बनावट नियुक्तीचं पत्र

याशिवाय रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदावरती हजर राहण्याबाबतचे पत्र या दोघांना दिले होते. मात्र ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेरीस किरण भिंगारदेवे यांनी रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेचे नोकरीची बनावट सही आणि शिक्याचे पत्रे देऊन फसवणूक केली असल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

मुंबई महानगरपालिकेचे खोटे नेमणूक पत्र

रमेश कांबळे आणि कुणाल जाधव या दोघांना विट्यातील दोघांची फसवणूक करत आणि या दोघांकडूनही 6 लाख रुपये उखळून या दोघांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमणूक झाल्याचे पत्र दोघांनाही देण्यात आले होते, मात्र पत्राची चौकशी केल्यानंतर ही दोन्ही पत्र खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र किरण भिंगारदेवे यांनी या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का

मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावतो म्हणून आणि मुंबई महानगरपालिकेच्या नावानं खोटी नेमणूक पत्र काढून फसवणाऱ्या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी सांगली, विटा भागाती आणखी कोणाची फसवणूक केली आहे का त्याची चौकशी या दोघांकडून करण्यात येत आहे.