Sangli Kidnapping : सांगलीतील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदाराचा नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपात झाल्याचा पोलिसांचा अंदाज

| Updated on: Aug 17, 2022 | 9:05 PM

माणिकराव पाटील हे सांगलीतील बांधकाम व्यावसायिक होते. 13 ऑगस्ट रोजी प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांना तुंग येथे नेले. त्यानंतर तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

Sangli Kidnapping : सांगलीतील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदाराचा नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपात झाल्याचा पोलिसांचा अंदाज
सांगलीत अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदारांचा नदीपात्रात आढळला मृतदेह
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : सांगलीतील अपहृत बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह (Deadbody) आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राम मंदिर परिसरात राहणाऱ्या शासकीय कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक (Builder) यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण करण्यात आले होते. सदरची घटना 13 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ ते पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास मिणचे मळा ते तुंगकडे जाणाऱ्या रोडवर घडली. तुंग येथे प्लॉट दाखवण्याचा बहाणा करून तुंग येथे नेऊन त्यांचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते. माणिकराव विठ्ठल पाटील (54) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी विक्रमसिंह माणिकराव पाटील (28) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करत पोलीस त्यांचा शोध घेत होते.

पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली

माणिकराव पाटील हे सांगलीतील बांधकाम व्यावसायिक होते. 13 ऑगस्ट रोजी प्लॉट दाखवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांना तुंग येथे नेले. त्यानंतर तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. माणिकराव घरी परतले नाही, त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान त्यांची गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात सापडली. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास सांगली कवठेपिरान गावच्या हद्दीत नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना आढळला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हा मृतदेह पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून घातपताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे डॉ संजय पाटील यांचे माणिकराव सख्खे मेहुणे

माणिकराव पाटील हे गेली 25 वर्षे सांगलीत बांधकाम व्यावसायिक आणि रस्ते कंत्राटदार म्हणून परिचित होते. त्यांचा मुलगा विक्रमसिंह हा देखील त्यांना व्यवसायात मदत करतो, तर मुलगी रेवा ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्यांच्या घरी मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांचे मूळगाव वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील आहे.  शालेय शिक्षण गोटखिंडी येथे तर डिप्लोमा लठ्ठे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हसत खेळत स्वभावाच्या व्यक्तीचा असा दुर्दवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ संजय पाटील यांचे माणिकराव पाटील हे सख्खे मेव्हणे असून, त्यांच्यावर गोटखिंडी येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. (Body of kidnapped government contractors found in riverbed in Sangli)

हे सुद्धा वाचा