भीषण अपघात! वर्ध्यात कार पुलावरुन कोसळली, मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

| Updated on: Jan 25, 2022 | 7:21 AM

वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे.

भीषण अपघात! वर्ध्यात कार पुलावरुन कोसळली, मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू
पुलावरील कठडा तोडून कार 40 फूट खाली कोसळली
Follow us on

वर्धा : चारचाकी एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात (Major Accident in Wardha) झाला आहे. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (7 Medical Student Killed in a Car Accident) झाल्याचं कळंतय. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

गेल्या 48 तासांतला तिसरा मोठा अपघात

राज्यातील भीषण अपघातांची मालिका सुरु असून रविवारी रात्रीपासून राज्यानं भीषण अपघात पाहिलेत. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. अवघ्या चोविस तासांस महाराष्ट्रात रस्ते अपघात आठ बळी गेले होते. अशातच सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे. वर्ध्यातील कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आता गेल्या 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृ्त्यू झाला आहे.

मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु

दरम्यान वर्धा अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पोलीस आणि प्रशासन अपघातप्रकरणी पुढील तपास करत असून सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर या अपघातानं मोठा आघात झाला आहे.

संबंधित बातम्या :

कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूनं गाठलं! तिघा भावंडावर काळाचा घाला, खड्डा चुकवण्याचा नाद जीवावर बेतला!

आजीसोबत देवदर्शनाला निघालेला चार वर्षाचा नातू जागीच ठार, बीडमध्ये भीषण अपघात!

काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात