Buldana Suicide : ‘तुला मुलीच होतात, मुलं होत नाहीत’ म्हणत जाच केला! 26 वर्षीय विवाहितेनं जीवच दिला

Buldana Crime News : या घटनेप्रकरणी अधिक तपास केला असता पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली.

Buldana Suicide : तुला मुलीच होतात, मुलं होत नाहीत म्हणत जाच केला! 26 वर्षीय विवाहितेनं जीवच दिला
विवाहितेची आत्महत्या
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 12:45 PM

बुलडाणा : बुलडाण्यातून (Buldana Crime news) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहितेनं आत्महत्या (Buldana Suicide News) केली. या विवाहितेचा सासरकडून सतत जाच केला जात होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून या विवाहितेनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या विवाहितेला सासरची लोकं तुला मूल जन्माला येत नाही म्हणून दोष देत होते. तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही, असं म्हणून वारंवार महिलेला त्रास दिला जात होता. पतीसह सासरचे लोक तिचा छळ करत होते. अखेर या 26 वर्षीय महिलेनं गळफास घेत जीव दिलाय. या घटनेन बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील या विवाहीत महिलेकडे पैशांचीही मागणी सासरचे लोक सातत्यानं करत होते. हुंड्याचे उरलेली रक्कम मिळवण्यासाठीही तिच्याकडे तगादा लावला होता. या महिलेच्या आत्महत्येनंतर आता सासरकड्यांचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस (Police Investigation) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मलकापूर हादरलं!

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वाघुळ या गावात 26 वर्षांच्या महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी अधिक तपास केला असता पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली.

आत्महत्या केलेल्या महिलेला दोन मुली आहेत. त्यांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलंय. पण आत्महत्या करणाऱ्या महिलेला दोन मुली असून तुला मुलीच होतात, मुलगा होता नाही, असं म्हणत वारंवार त्रास दिला जात होता. शिवाय आईवडिलांकडून हुंड्यातील राहिलेले 50 हजार रुपये घेऊन ये, यासाठी या महिलेकडे सासरच्या लोकांनी सारखा तगादा लावला होता. दरम्यान, या महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून अखेरजीव दिलाय. ज्योती सानिसे असं आत्महत्या केलेल्या विवाहीत महिलेचं नाव आहे.

याप्रकरणी मृतक ज्योती सनिसे हीचा पती गजानन सनिसे, सासू इंद्रायणी सनिसे, सासरे दशरथ सनिसे , दीर दीपक सनिसे, जेठाणी नंदा सनिसे, सविता दीपक सनिसे, नणंद ज्योति विलास वावगे यांच्या विरुद्ध मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.