व्यापाऱ्याची स्कॉर्पिओ गाडी जाळली, घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ जळून खाक, व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान, गाडी जाळणारा आरोपी

BULDHANA NEWS : चिखली येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याची स्कॉर्पिओ गाडी जाळली, घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ जळून खाक, व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद, गाडी जाळणारा आरोपी अटक केली आहे.

व्यापाऱ्याची स्कॉर्पिओ गाडी जाळली, घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ जळून खाक, व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान, गाडी जाळणारा आरोपी
one arrested cctv camera
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 22, 2023 | 8:06 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana news) जिल्ह्यातील चिखली (chikhali) येथील प्रतिष्ठित व्यापारी स्वप्नील गुप्ता (swapnil gupta) यांच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी नयन बोंद्रे या आरोपीने रात्री जाळली असल्याचं स्पष्ट झालंय. ही संपूर्ण घटना घराशेजारी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून आरोपी नयन बोंद्रे याला चिखली पोलिसांनी अटक केली. तर त्याचबरोबर आरोपींवर गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.

अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला

चिखली शहरात राहणारे प्रतिष्ठित व्यापारी स्वप्नील गुप्ता हे नेहमीप्रमाने रात्री घरी आले आणि घराशेजारी त्यांची स्कॉर्पिओ गाडी उभी करून घरात गेले आणि झोपले. मात्र रात्री दरम्यान त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला आग लागल्याचे समजताच शेजारील लोकांनी आरडाओरड केली. तर अग्निशमन दलाला ही बोलावण्यात आले होते, मात्र गाडीला लागलेल्या आगीन रौद्ररूप धारण केलेले होता. अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. यामधे व्यापारी स्वप्नील गुप्ता यांचे मोठ नुकसान झाले असून गाडीत महत्त्वाची काही गोष्टी सुध्दा जळाल्या आहेत. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली एवढं मात्र नक्की. ज्या आरोपीने ही गाडी जाळली तो आरोपी नयन बोंद्रे हा cctv मध्ये कैद झालं असून त्याच्यावर चिखली पोलिसांत गुन्हा दाखल केलाय . मात्र आरोपीने गाडी का जाळली हे अद्यापही समोर आले नाले तरी या घटनेला जुन्या वादाचे स्वरूप असल्याचे कळत आहे.

या प्रकऱणात आता पोलिस काय कारवाई करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.