मुलाने मुलीला पळवलं, दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, या कारणामुळे गावात पोलीस छावणीचे स्वरूप

दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्यामुळे काही लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर एकमेकांविरुद्ध तक्रारी सुध्दा दाखल झाल्या आहेत. पळून गेलेल्या मुला-मुलीचा पोलिस आणि नातेवाईक शोध घेत आहेत. मुलगा मुलगी सापडल्यानंतर पोलिस काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुलाने मुलीला पळवलं, दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, या कारणामुळे गावात पोलीस छावणीचे स्वरूप
Wadner Bholji
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 16, 2023 | 11:59 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : वडनेर भोळजी (Wadner Bholji) येथे तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एका समाजातील मुलाने दुसऱ्या समाजातील मुलीला पळविल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी (BULDHANA NEWS) दिली आहे. दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झालं असून तब्बल 17 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. वडनेर भोलजी गावाला पोलीस (POLICE) छावणीचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी ही घटना गावात समजली, त्यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं पोलिस सांगत आहेत. पोलिसांचं एक पथक गावात असून दंगा भडकावणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं जात आहे. त्याचबरोबर नातेवाईक आणि पोलिस मुलगा आणि मुलीचा शोध घेत आहेत.

ग्रामस्थानी पोलिस स्टेशनला जाऊन गोंधळ घातला

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात वडनेर भोलजी या गावी एका समाजातील मुलाने दुसऱ्या समाजातील मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडलीय. त्यामुळे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्या, त्याचबरोबर गाड्यांची जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे. तर ग्रामस्थानी पोलिस स्टेशनला जाऊन गोंधळ घातला असल्याची माहिती मिळाली आहे.

गावाला छावणीचे स्वरूप

या घटनेमुळे वडनेर भोलजी गावात सध्या तणाव सदृश्य परिस्थिती असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. तर पोलिसांनी घटनास्थळ दाखल गाठत तब्बल 17 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून दंगल घडवणार्‍यांची धरपकड मोहीम सुरू आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून दंगा काबू पथकासह पोलिसांची मोठी कुमक वडनेर भोलजी या गावात दाखल झाली आहे. त्यामुळे वडनेर भोलजी या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी