AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News :खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान, मात्र सहा महिने उलटूनही…

वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात बियाणे टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Agriculture News :खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान, मात्र सहा महिने उलटूनही...
farmerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 16, 2023 | 8:49 AM
Share

अमरावती : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) व जिल्हा कृषी विभागाने (District Agriculture Department) दम भरल्यानंतर पिक विमा कंपनीने (Crop Insurance Company) शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही अमरावती जिल्ह्यातील 24 हजार 540 शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मात्र पीक विमा काढूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. 1 लाख 10 हजार 652 शेतकऱ्यांनी नुकसानाची तक्रारी केल्या होत्या. तर आतापर्यंत 72 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र सहा महिने उलटूनही 24 हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चांण यांनी सांगितली.

शेतरस्त्यांसाठी पाडळी शिंदे ग्रामस्थांचे उपोषण सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्ते योजनेत गावपातळीवर रस्त्यांची कामे करावी, तसेच नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे त्रस्त होऊन गावातीलच नदीपात्रात उपोषण सुरू केले आहे. मागील तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू करण्यात आले असून, बेमुदत उपोषणास बसलेल्या एकाची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी बळजबरीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. देऊळगाव राजा तहसीलदार यांनी उपोषण कर्त्याला भेट दिली. यावेळी तहसीलदार यांनी संबंधित रस्ते हे योजना बाह्य असल्याने या रस्त्याच्या कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे. मात्र, उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात बियाणे टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश प्रकल्पात आजही पाणी साठा उपलब्ध असून या पाण्याच्या आधारे उन्हाळी पिके घेत आहेत. पांगरी नवघरे या गावातील शेत पारिसरातील शेतकरी मुंग पिकाची पेरणी करीत असतानाचं चित्र दिसून येत आहेत.

द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

गेल्या पाच-सहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकच्या निफाडमध्ये थंडीची लाट कायम असल्याने तालुका गारठून निघाला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीच्या पाऱ्यात दररोज चढ-उतार होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. फुगवणीला आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे द्राक्षांच्या दरावर परिणाम होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.