लव्ह मॅरेज, दोन आलिशान शोरुम, पत्नी-मुलगा..कोट्यधीश बिझनेसमॅनने का संपवलं संपूर्ण कुटुंब?

"कुठेही तणाव जाणवला नाही. इतकी की त्यांनी माझ्याकडून मोबाइलचा चार्जर सुद्धा मागून नेलेला. हे कधी, कसं आणि का झालं? हे कळलच नाही. आम्हालाही हा मोठा धक्का आहे"

लव्ह मॅरेज, दोन आलिशान शोरुम, पत्नी-मुलगा..कोट्यधीश बिझनेसमॅनने का संपवलं संपूर्ण कुटुंब?
sachin grover end his life
| Updated on: Aug 27, 2025 | 2:43 PM

35 वर्षाच्या कोट्यधीश व्यावसायिकाने पत्नी आणि मुलासह जीवन संपवलं. ही बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. व्यावसायिक सचिन ग्रोवरच्या पत्नीने इतकं टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या आईला 36 पानी पत्र पाठवलेलं. WhatsApp वर हे पत्र पाठवलेलं. या नोटमध्ये जीवन संपवण्याचं कारण सांगितलं आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुमधील काय आहे हे प्रकरण, विस्ताराने जाणून घ्या. दुर्गा एन्क्लेव हा शाहजहांपुरमधील पॉश भाग आहे. इथे 35 वर्षांचा सचिन ग्रोवर कुटुंबासोबत राहत होता. त्याची गणना इथल्या कोट्याधीश व्यावसायिकांमध्ये व्हायची. सचिनचे वडिल विजय कुमार यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. घरी आई आणि दोन भावांसोबत सचिन रहायचा. 2200 चौरस मीटरमध्ये सचिन ग्रोवरच दोन मजली घरं आहे. 8 वर्षांपूर्वी घरासमोर राहणाऱ्या शिवांगी (30) गर्लफ्रेंडसोबत लव्ह मॅरेज केलेलं.

लग्नानंतर सचिन पहिल्या मजल्यावर रहायला गेला. त्यांचं बाकी कुटुंब तळ मजल्यावर रहायचं. सचिनच्या घराची किंमत कोट्यवधीमध्ये आहे. सचिनचे दोन्ही भाऊ रोहित आणि गौरवच लग्न झालय. सचिनचे शहरात पानीपत हँडलूम नावाने दोन शो रुम होते. त्याचे दोन भाऊ सुद्धा हँडलूमचा व्यवसाय करतात.

खिडकीतून आत दिसलं भयानक दृश्य

बुधवारी सचिनच्या घरात हालचाल दिसली नाही, त्यावेळी कुटुंबाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी खिडकीतून आत वाकून बघितलं, तेव्हा सचिन आणि शिवांगीचे मृतदेह दिसले. शिवांगीचा मृतदेह बेडरुममध्ये होता. पती सचिनचा मृतदेह ड्रॉइंग रुममध्ये होता. लगेच दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दुसऱ्या खोलीत चार वर्षाच्या निरागस फतेहचा मृतदेह होता. लगेच तिघांना रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

जीवन संपवण्याचं कारण काय?

पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. प्रकरणाचा तपास सुरु केलाय. मृत्यूपूर्वी सचिनची बायको शिवांगीने तिच्या आईला 36 पानी नोट WhatsApp वर पाठवल्याच तपासातून समोर आलं. त्यात लिहिलेलं, माझ्यामुळे तुम्ही त्रस्त असता. आता तुम्ही निश्चिंत राहा. यात आर्थिक अडचणी आणि कर्जाचा उल्लेख आहे. घर आणि कारच कर्ज होतं.

‘मोबाइलचा चार्जर सुद्धा मागून नेलेला’

सचिनची वहिनी ज्योतीने सांगितलं की, “मंगळवारी संध्याकाळी आम्ही बाजारातून आलो, तेव्हा पाहिलं की, दीर-जाऊबाई मुलासोबत आनंदात होते”