Pune Crime : पुण्यात टॅक्सीमध्ये महिलेकडेपाहून ड्रायव्हरच नको ते कृत्य, स्वागरगेट पाठोपाठ दुसरी धक्कादायक घटना

Pune Crime : पुण्यास स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका टॅक्सी चालकाने महिलेसमोरच नको ते कृत्य केलं. हा सगळा प्रकार हादरवून सोडणारा आहे.

Pune Crime : पुण्यात टॅक्सीमध्ये महिलेकडेपाहून ड्रायव्हरच नको ते कृत्य, स्वागरगेट पाठोपाठ दुसरी धक्कादायक घटना
Pune Crime
| Updated on: Feb 27, 2025 | 12:11 PM

पुण्यात वाढत्या गुन्हेगारी बरोबर महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच सत्र सुरुच असतं. अधनं-मधनं पुण्याच्या अमुक एका भागात किंवा दुसऱ्या भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याच्या बातम्या येतच असतात. आता पुणे शहर महिलांसाठी देखील असुरक्षित बनत चाललं आहे. नुकत्यात घडलेल्या दोन घटनांवरुन तसच दिसत आहे. पुण्यात स्वागरगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने घरी निघालेल्या एका आयटी प्रोफेशनल तरुणीसमोर एका कॅब चालकने धक्कादायक कृत्य केलं. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता, कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली. संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली.

हस्तमैथून करण्यास सुरुवात

गाडी चालवत असताना, आरोपी ड्रायव्हरने रियर व्ह्यू मिररमधून पीडितेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले. रविवारी खडकी पोलिसांनी 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली.

आरोपी कुठल्या राज्यातला?

खडकी पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील असून, तो नुकताच मुंबईतून पिंपरी-चिंचवडला कामासाठी आला होता.

आरोपी जामिनावर बाहेर

महिलेने गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. महिलेनं ज्या अँप वरून कॅब बुक केली त्या माहितीच्या आधारे वाहन क्रमांक घेत कॅब चालकाला अटक केली. 21 फेब्रुवारीची ही घटना आहे आरोपी सुमित कुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अशी घटना घडणं एक गंभीर बाब

पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या एका आरोपीने सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला. पुण्यासारख्या विकसित आणि सतत वदर्ळ असलेल्या स्वारगेट डेपो परिसरात अशी घटना घडणं एक गंभीर बाब आहे.