
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बॉलीवूड स्टार सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली होती. आता लॉरेन्स बिश्नोई याला कॅनडा सरकारने अतिरेकी घोषीत केले आहे आणि त्याच्या गँगलाही अतिरेकी संघटनेच्या यादीत टाकल्याने तुरुंगातून असून आपली आंतरराष्ट्रीय गँग चालवणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई आता काय होणार असा सवाल केला जात आहे. कॅनडा सरकारने लाँरेन्स बिश्नोई याला आणि त्याच्या गँगला अतिरेकी घोषीत केले आहे. आता कॅनडात बिश्नोई गँगची संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्याच्या गँगला पैसा देणारे आणि अन्य मदत करणारेही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. त्यामुले कॅनडातील बिश्नोई गँगच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला आहे. या लाँरेन्स बिश्नोई गँगवर अनेक हत्या आणि गुन्हेगारी कारवायात सहभागी असल्याचा आरोप असून त्याचे नेटवर्क भारत, कॅनडा आणि अन्य देशात पसरलेले आहे. जेलमध्ये राहूनही बिश्नोई मोबाईलच्या मार्फत त्याचे नेटवर्क चालवत आहे. ...