Jawahar : वाळवंडा येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू; एकजण चिंताजनक

दीपक तुंबडा 21 वर्ष, संदेश ओझरे 25 वर्ष या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. योगेश कुवरा 24 वर्ष हा नाशिक येथे रुग्णालयात कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jawahar : वाळवंडा येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू; एकजण चिंताजनक
वाळवंडा येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू; एकजण चिंताजनक
Image Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 7:59 AM

ठाणे : जव्हार (Jawahar) तालुक्यातील वाळवंडा (Walvanda) येथील राष्ट्रीय महामार्गावर विक्रमगडहुन जव्हारकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन व दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. ही घटना गुरुवारी सांयकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास घडली. भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी वाहनाने बाईकचा जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, त्यावेळी घटनास्थळी असणारे एकदम भयभीत झाले. बाईकवरून निघालेल्या दोघांचा जागीचं मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली. नेमका अपघात कशामुळे झाला याची पोलिस चौकशी करणार आहेत.

दोघांचा जागीचं मृत्यू; एकजण चिंताजनक

दीपक तुंबडा 21 वर्ष, संदेश ओझरे 25 वर्ष या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. योगेश कुवरा 24 वर्ष हा नाशिक येथे रुग्णालयात कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी इतका जोरात आवाज आला की, घटनास्थळी असणारे लोकं घाबरुन गेली. ही बातमी नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिस अपघातस्थळी दाखल झाल्यानंतर एकदम चक्रावून गेले. त्यांनी दोन्ही गाड्यांची तिथं पाहणी केली. अपघात झाल्यानंतर तिथल्या परिसरातील बघ्यांची अधिक गर्दी होती.

कारने तिघांना जोराची टक्कर दिल्याची माहिती

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी तिथल्या शासकीय रुग्णालयात देण्यात आलं आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. अपघातामध्ये कोमात गेलेल्या तरुण चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. भरधाव वेगाने निघालेल्या कारने तिघांना जोराची टक्कर दिल्याची माहिती तिथल्या ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आहे.