AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Patna Airport : प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचा दावा केल्याने उडाली खळबळ, तपासणी करताना पोलिस चक्रावले

बॉम्ब निकामी पथकाने उड्डाणाची बारकाईने तपासणी केली. फ्लाइटमध्ये काहीही सापडले नसले, तरी खबरदारी म्हणून फ्लाइट रद्द करून सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आले.

Patna Airport : प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचा दावा केल्याने उडाली खळबळ, तपासणी करताना पोलिस चक्रावले
प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचा दावा केल्याने उडाली खळबळ, तपासणी करताना पोलिस चक्रावलेImage Credit source: twitter
| Updated on: Jul 22, 2022 | 7:06 AM
Share

मुंबई – अनेकदा बॉम्ब असल्याच्या अफवा पसरवल्या जातात, किंवा निनावी फोन करुन तशी माहिती दिली जाते. पाटणा (Patna) विमानतळावरून (Airport) उड्डाण करणाऱ्या एका प्रवाशाने बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यानंतर विमानात असलेल्या सगळ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देऊन विमान उतरवण्यात आले. त्यानंतर तिथल्या पोलिसांनी (Police) विमानाची पाहणी केली. पण विमानात काहीचं सापडलं नाही. उतरवलेलं विमान आज सकाळी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं

पाटणाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E2126 टेक ऑफ करत असताना ऋषी चंद सिंग नावाच्या प्रवाशाने दावा केला की त्यांच्याकडे बॉम्ब आहे. त्यानंतर उड्डाण रद्द करून संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी ऋषीचंद सिंग याला ताब्यात घेतले आहे. चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला घेतलं ताब्यात

बॉम्ब निकामी पथकाने उड्डाणाची बारकाईने तपासणी केली. फ्लाइटमध्ये काहीही सापडले नसले, तरी खबरदारी म्हणून फ्लाइट रद्द करून सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा प्रवासी ऋषीचंद सिंग हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा विमानतळ पोलिसांनी दावा केला आहे. शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

अशा घडना वाढल्या

गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही कारणाने विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगच्या घटना समोर येत आहेत. गुरुवारीच एअर इंडियाचे विमान AI 934 (दुबई-कोची) उड्डाण दरम्यान खराब हवामानामुळे मुंबईकडे वळवण्यात आले आहे. विमानाने मुंबईत सुरक्षित लँडिंग केले. 21 जुलै रोजी एअर इंडियाच्या बोईंग फ्लीट एअरक्राफ्ट प्रकार B787 ला काही समस्या आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर फ्लाइट वळवण्यात आली आणि मुंबईला लँडिंग करण्यात आले. अशा घटना वारंवार घडत असल्याने तपास यंत्रणांची भंबेरी उडत आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.