AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या विमानात बिघाड : दुबईहून कोचीला येणारे विमान मुंबईकडे वळविले; विमानात 258 प्रवासी होते

गोएअरचे विमान मंगळवारी लेहहून दिल्लीकडे जात होते त्यावेळी धावपट्टीवर कुत्रे आल्याने ते उडू शकले नाही, त्यामुळे गोएअरची ही मंगळवारची तिसरी घटना होती. जेव्हा गोएअरची उड्डाणे त्यांच्या ठराविक वेळेत पोहचू शकली नसल्याने आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गोएअरची दोन्ही उड्डाणे ही इतर ठिकाणी वळवण्यात आली होती.

एअर इंडियाच्या विमानात बिघाड : दुबईहून कोचीला येणारे विमान मुंबईकडे वळविले; विमानात 258 प्रवासी होते
| Updated on: Jul 22, 2022 | 12:17 AM
Share

मुंबईः एअर इंडियाचे दुबई-कोची (Air India’s Dubai-Kochi) विमान (फ्लाइट क्रमांक B787) गुरुवारी अचानक मुंबईकडे वळवण्यात आले. कमांड पायलटने कमी केबिनचा दाब नोंदविल्यामुळे विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग (Safe landing of the plane in Mumbai) करण्यात आले. यावेळी विमानात 258 प्रवासी होते. गुरुवारी दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या गो फर्स्ट (GOFIRST) विमानाचे विंडशील्ड वाऱ्याने तुटले होते, त्यानंतर ते विमान अचानक जयपूरकडे वळवण्यात आले होते, हेविमान बुधवारी दुपारी 12.40 वाजता दिल्लीहून निघाले असल्याचे सांगण्यात आले होते. विंडशील्डमध्ये क्रॅक आढळल्यानंतर ते दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र खराब हवामानामुळे जयपूरमध्येच त्याचे लँडिंग करण्यात आले. गो फर्स्ट विमानात तांत्रिक बिघाड होण्याची ही सलग दोन दिवसातील चौथी घटना होती.

धावपट्टीवर कुत्रा आला

गोएअरचे विमान मंगळवारी लेहहून दिल्लीकडे जात होते त्यावेळी धावपट्टीवर कुत्रे आल्याने ते उडू शकले नाही, त्यामुळे गोएअरची ही मंगळवारची तिसरी घटना होती. जेव्हा गोएअरची उड्डाणे त्यांच्या ठराविक वेळेत पोहचू शकली नसल्याने आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गोएअरची दोन्ही उड्डाणे ही इतर ठिकाणी वळवण्यात आली होती.

उड्डाणे वळवण्याच्या घटना वाढल्या आली

रविवारी, 17 जुलै रोजी, तांत्रिक बिघाडामुळे एकापाठोपाठ एक दोन भारतीय विमान कंपन्यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळवण्यात आली होती. कालिकतहून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान मस्कतला तर शारजाहून हैदराबादला येणारे इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीमध्ये अचानक येथे लँडिंग करण्यात आले.

स्पाईसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड

गेल्या महिनाभरात स्पाइसजेटच्या बहुतांश विमानांमधून तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 11 जुलै रोजी दुबई-मदुराई फ्लाइटमध्ये चाक निकामी झाल्याचे घटना घडली होती. 19 जूनपासून सुरू झालेल्या नऊपेक्षा जास्त तांत्रिक त्रुटींपर्यंत पोहोचल्यानंतर डीजीसीएने 6 जुलै रोजी स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

विमान कंपन्यांवर कडक कारवाई

गेल्या काही दिवसांपासून प्रवासी विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे आता डीजीसीएने याबाबत कडक धोरण अवलंबविले आहे. कोणत्याही एअरलाइन्सच्या विमानाला तळ किंवा विमानतळावरून उड्डाण करण्याची परवानगी असेल तरच परवानाधारक कर्मचार्‍यांनी त्याच्या सुरक्षेबाबत मान्यता दिली आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.