वडिलांचं त्या बाईसोबत असलेलं नातं मुलांना खटकलं, अखेर मुलांनी ठरवून तसंच केलं; पण…

| Updated on: Mar 02, 2023 | 4:02 PM

छत्तीसगडमध्ये चार वर्षांपूर्वी हत्येनं खळबळ उडाली होती. मुलांनी वडिलांची हत्या करून हत्या करून घटनास्थळावरून फरार झाले होते. अखेर पोलिसांनी तपास सुरु ठेवला आणि त्यांना बेड्या ठोकल्या.

वडिलांचं त्या बाईसोबत असलेलं नातं मुलांना खटकलं, अखेर मुलांनी ठरवून तसंच केलं; पण...
वडिलांचं होतं दुसऱ्या बाईसोबत लफडं, मुलांना कळताच त्यांनी केलं असं की...
Image Credit source: freepik
Follow us on

छत्तीसगड : वडिल आणि एका बाईचं असलेलं कथित नातं ऐकून दोन्ही मुलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. हे नातं दोन्ही मुलांना पसंत नव्हतं. त्यासाठी दोघांनी टोकाचा निर्णय घेतला आणि कट रचला. रक्ताच्या नात्याचा विचार न करता दोन्ही मुलांनी वडिलांचीच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलं फरार झाली. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना वारंवार आरोपी चकवा देत होते. तसेच त्या महिलेने आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या पाठी तगदा लावला होता. अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी मुंगेरमधून दोन्ही मुलांना अटक केली आहे. यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. छत्तीसगड पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या चापामधील जहांगीर गावात 11 डिसेंबर 2019 रोजी दोन्ही मुलांनी वडिलांची गळा दाबून हत्या केली होती. मृत वडिलांचे नाव धर्मवीर सिंह असं आहे. तर आरोपी असलेल्या दोन मुलांची नावं छोटू सिंह आणि संदीप सिंह अशी आहेत. या प्रकरणी प्रेमसंबंध असलेल्या महिलेनं पोलिसात तक्रार केली होती. सदर महिला प्रेमाखातर बिहारहून छत्तीसगडला पळून आली होती. यावेळी वडिलांचं आणि तिच्या संबंधांबाबत मुलांना कळलं आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. वडिलांची हत्या करून दोन्ही मुलं फरार झाले होते.

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, छोटू सिंह आणि संदीप सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ती वारंवार पोलीस स्टेशन जाऊन माहिती घ्यायची.त्यानंतर तपास करताना छत्तीसगड पोलिसांनी मुंगेर पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि फरार आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर 4 वर्षानंतर आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.