AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यात तिची काय चूक? वाद आजोबासोबत, मग मरणयातना नातीला का?

आजोबासोबत असलेल्या वादाच्या रागातून 10 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करत लैंगिक केले, मग तिची हत्या केल्याची घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

यात तिची काय चूक? वाद आजोबासोबत, मग मरणयातना नातीला का?
पालघरमध्ये जुन्या वादातून मुलीचे अपहरण करत अत्याचारImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 02, 2023 | 3:23 PM
Share

पालघर / प्रवीण चव्हाण : जुन्या वादातून तलासरी तालुक्यातील डोंगरी येथील 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. आजोबासोबत असलेल्या पैशाच्या जुन्या वादातून चिमुरडीसोबत हे भयानक कृ्त्य केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या 12 तासाच्या आत तपास करत आरोपीला अटक केली आहे. रमेश डायला दुबळा असे अटक करण्यात आलेल्या 46 वर्षीय इसमाचे नाव आहे. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने संधी साधत तिचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार केला. मग गुन्हा लपवण्यासाठी मुलीची हत्या केली.

शाळेत गेली ती परतलीच नाही

तलासरी तालुक्यातील डोंगरी येथील 10 वर्षीय मुलगी मंगळवारी सकाळी शाळेत जाण्यास निघाली. मात्र सायंकाळी मुलगी घरी परत आलीच नाही. यामुळे पालकांनी गावात शोधाशोध केली. परंतु मुलीचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर पालकांनी तलासरी पोलीस स्टेशन गाठत रात्री उशिरा अज्ञात इसमाने मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सीसीटीव्हीच्या आरोपीला अटक

तलासरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध पथकं तयार करून मुलीच्या शोधार्थ आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना परिसराजवळ राहणाऱ्या इसमाने अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेचच्या आधारे निष्पन्न झाले. अधिक तपास आणि चौकशी करत सदर इसमाला ताब्यात घेत पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपीने शाळेत जात असताना अपहरण करत हत्या केल्याचे कबुल केले.

पीडितेच्या आजोबाचा आणि आरोपीचा पैशावरुन वाद होता

आरोपी हा मुलीच्या आजोबासोबत समुद्रात बोटीत मासेमारीकरीता खलाशी म्हणून जात होता. परंतु खलाशी असताना देवाण-घेवाणीतील पैसे दिले नाहीत म्हणून वारंवार त्यांच्यात खटके उडत होते. याचा मनात राग धरून नराधम दुबळा याने मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला गुजरात राज्यातील भिलाड संजान रोडवरील वनविभागाच्या जंगलाच्या झाडी झुडपात नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली.

हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पालापाचोळ्यात लपवून पोलीस आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाही, अशा समजुतीत घरी आला होता. परंतु पोलीस निरीक्षक अजय वसावे आणि उपनिरिक्षक यांच्या पथकाने कसलाही पुरावा नसताना शोध घेत आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत