उधारीचे पैसे दिले नाही म्हणून दूध विक्रेत्याने ग्राहकाला चोपले, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

दुधाच्या उधारीचे पैसे दिले नाही म्हणून दूध विक्रेत्याने मित्र आणि नातेवाईकांसह मिळून ग्राहकाला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.

उधारीचे पैसे दिले नाही म्हणून दूध विक्रेत्याने ग्राहकाला चोपले, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये भररस्त्यात दूध विक्रेत्याकडून ग्राहकाला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 9:46 AM

कल्याण / सुनील जाधव : कल्याण पूर्वेकडील अमेय हॉस्पिटलच्या आवारात एका तरुणाला काही तरुणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उधारीवर घेतलेल्या दुधाचे 3 हजार रुपयांचे बिल दिले नाही. या रागातून दूध विक्रेत्याने मित्र आणि नातेवाईकांना सोबत घेऊन थेट ग्राहकाच्या अंगावर धाव घेतली आणि त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. राडेबाज तरुणांच्या कृत्याने कल्याण पूर्व परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.

ग्राहकाने महिनाभर फुकटात घेतले दूध

ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली, त्या तरुणाने दूध विक्रेत्याकडून महिनाभर फुकट दूध घेतले. त्या पैसे द्यायची वेळ आली, त्यावेळी त्याने आज-उद्या अशी टोलवाटोलवी सुरु ठेवली होती. दुधाचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने तरुणाबाबत दूध विक्रेत्याच्या मनातील संताप अनावर होत चालला होता. काही महिने दुधाचे पैसे वसूल करण्यासाठी हेलपाटे मारावे लागले. मात्र नंतर तो घरी सापडेनासा झाला होता. त्यातूनच ही मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

दुधाचे पैसे थकवणाऱ्या तरुणाचा थांगपत्ता सापडला अन…

महिनाभर फुकट दूध घेऊनही पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्याचा निश्चय दूध विक्रेत्याने केला होता. याचदरम्यान तो तरुण काल संध्याकाळी कल्याण पूर्वेच्या परिसरातील अमेय हॉस्पिटलच्या आवारात आल्याची माहिती दूध विक्रेत्याला मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

त्या माहितीच्या आधारे दूध विक्रेत्याने आपल्या मित्र आणि नातेवाईकांना सोबत घेतले आणि घटनास्थळी गाठले. तेथे तो तरुण उभा असल्याचे दूध विक्रेत्याला दिसले. तो तरुण पुन्हा पळून जाण्याच्या आधीच दूध विक्रेत्याने त्याला लगेच पकडले आणि त्याचे काहीही म्हणणे ऐकून न घेता बेदम मारहाण सुरु करण्यात आली. त्याला लाथाबुक्क्या घालून खाली पाडण्यात आले.

मध्यस्थीसाठी पुढे सरसावलेल्या नागरिकांना शिवीगाळ

हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेले अमेय हॉस्पिटलमधील कर्मचारी तसेच इतर नागरीकांनाही दूध विक्रेता व त्याच्या नातेवाईकांनी शिविगाळ सुरु केली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची अद्याप पोलिसांत नोंद झाली नसल्याचे समजते. मात्र सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास करून कारवाई केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.