AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Raghuvanshi : ‘साहेब मला वाचवा, नाहीतर पुढचा राजा रघुवंशी मी…’ धक्कादायक प्रकरण, शरीरसंबंधांचा आरोप

Raja Raghuvanshi : इंदूरच्या राजा रघवुंशी प्रकरणाने सगळ्या देशाला हादरवून सोडलय. हनिमूनला गेलेल्या जोडप्यातील पत्नीने पतीला प्रियकराच्या मदतीने संपवलं. 2000 फूट खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. या धक्कादायक प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण समोर आलय. यात 'साहेब मला वाचवा, नाहीतर पुढचा राजा रघुवंशी मी...' असं एका युवकाने म्हटलय. काय आहे हे प्रकरण?

Raja Raghuvanshi : 'साहेब मला वाचवा, नाहीतर पुढचा राजा रघुवंशी मी...' धक्कादायक प्रकरण, शरीरसंबंधांचा आरोप
Chhatarpur Case
| Updated on: Jun 16, 2025 | 3:05 PM
Share

मध्य प्रदेशमधील इंदूरच्या राजा रघुवंशी प्रकरणानंतर युवकांमध्ये भय दिसू लागलय. आता मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एका चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलय. इथे एका युवकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिला. त्याने युवतीपासून स्वत:ला वाचवण्याची विनंती केली. त्याने सांगितलं की, ‘जर मला वाचवलं नाही, तर मी पुढचा राजा रघुवंशी असेन’ छतरपूर जिल्ह्यातील नौगांव क्षेत्रातील निवासी लकीने (विकास पटेरिया) सांगितलं की, “इन्स्टाग्रामवर तो एका युवतीच्या संपर्कात आला. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली” लकीच्या म्हणण्यानुसार, ‘मैत्रीचा धागा घट्ट झाल्यानंतर युवती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागली’ लकीचा दावा आहे की, ‘युवती आधीपासून विवाहित आहे. ती एक ब्लॅकमेलर आहे’ ‘युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैशांची मागणी करते’ असं लकीने सांगितलं.

या प्रकरणात युवतीने सुद्धा गंभीर आरोप केल्यानंतर नवीन टि्वस्ट आला. युवती एक युट्यूबर आहे. तिने एसपी कार्यालयात अर्ज देऊन लकीवर गंभीर आरोप केले. तिचा आरोप आहे की, “लकीने लग्नाच आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला स्वीकारायला नकार दिला” तिने सुद्धा पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.

कोण खरं बोलतय? कोण खोटं?

या हाय-प्रोफाईल प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नौगांव पोलीस ठाणे प्रभारी सतीश सिंह यांनी या प्रकरणात माहिती देताना सांगितलं की, “युवतीवर याआधी सुद्धा ब्लॅकमेलिंगचे आरोप झाले आहेत. त्याचा तपास नौगांव पोलीस करत आहेत. ताज्या प्रकरणात पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. जेणेकरुन सत्य समोर यावं” या प्रकरणाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर होणारी मैत्री आणि त्याचे धोके समोर आले आहेत. या प्रकरणात कोण खरं बोलतय? कोण खोटं? हे तपासानंतरच समोर येईल.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.