मुलीला कॉल करण्यावरून वाद, दोन गट आपापसात भिडले !

मुलीला कॉल केल्याबाबत जाब विचारल्यावरुन दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीला कॉल करण्यावरून वाद, दोन गट आपापसात भिडले !
मुलीला कॉल केल्याच्या रागातून दोन गटात राडा
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 09, 2023 | 10:21 AM

गोंदिया / शाहिद पठाण : मुलीला कॉल केल्याच्या कारणातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गोंदियातील जगावला येथे घडली आहे. या हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांवर गंगाझरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 323, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र गणराज रिनाईत, गणराज रिनाईत, मनोज कैलाश पारधी आणि एक महिला अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुलीला कॉल केल्याचा जाब विचारल्यावरुन वाद

दोन्ही गट एकमेकांचे शेजारी आहेत. मनोज कैलाश पारधी या तरुणाने रिनाईत यांच्या पुतणीला कॉल केला. यावरुन रिनाईत यांनी मनोजला आपल्या पुतणीला कॉल का करतो असे विचारले. याचा राग आल्याने मनोजने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले.

दोन्ही गटातील पाच जण जखमी

यानंतर दोन जोरदार हाणामारी होऊन दोन्ही गटातील मिळून पाच जण यात जखमी झाले. याप्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेंद्र रिनाईत, गणराज रिनाईत आणि त्यांच्या आईला मनोजने काठीने मारहाण केली. तर रिनाईत यांनीही मनोज आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. याप्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागेच्या वादातून दोन गटात राडा

जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर येथील उस्मानपुरा परिसरात घडली. सुमारे 50 ते 60 जणांच्या जमावात तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली. राडा करणाऱ्या सर्व आरोपींवर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सर्व आरोपींना अटक केली. तुफान दगडफेक आणि राड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.