पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा, हवेत फायरिंग; एक जखमी

| Updated on: Mar 02, 2023 | 6:38 PM

वाद मिटवण्यासाठी आलेले दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना वर्ध्यात उघडकीस आली आहे. या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा, हवेत फायरिंग; एक जखमी
आश्रमात अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण
Follow us on

वर्धा : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. यावेळी एका गटातील एकाने हवेत फायरींगही केल्याची माहिती मिळते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीत एक जण जखमी झाला. दोन्ही गटाविरोधात शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाद मिटवण्यासाठी आले असता हाणामारी

वर्ध्यातील स्टेशनफैल परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात राडा झाला. वाद मिटवण्यासाठी आले असता दोन्ही गट एकमेकांना भिडल्याची माहिती मिळते. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर पोलीस ठाण्यात उपचार सुरु आहेत. दोन गटात नेमका काय वाद होता याबाबत अद्याप कळू शकले नाही.

कल्याणमध्ये दूधाचे पैसे दिले नाही म्हणून ग्राहकाला बदडले

दूधाचे बिल दिले नाही म्हणून कल्याणमध्ये दूध विक्रेत्याने नातेवाईक आणि मित्रांसोबत मिळून मारहाण केल्याची घटना आज सकाळी कल्याणमध्ये घडली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मध्यस्थीसाठी गेलेल्या नागरिकांनाही आरोपींना शिवीगाळ केली. माराहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक महिने पाठपुरावा करुनही ग्राहक दुधाचे 3 हजार रुपये बिल देत नव्हता. तसेच घरीही सापडत नव्हता. अखेर संतापलेल्या दूध विक्रेत्याने त्याला रस्त्यात गाठले आणि धू धू धुतले. ग्राहकाने महिनाभर दूध घेतले होते. मात्र पैसे द्यायला टाळाटाळ करत होता.