किळसवाणं आणि संतापजनक ! दारुच्या नशेत वडिलांकडून तरुणीवर जबरदस्ती, काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल

आपल्या पुतणीसोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली कल्याणमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Congress leader Surendra Adhav misbehave with girl in Kalyan).

किळसवाणं आणि संतापजनक ! दारुच्या नशेत वडिलांकडून तरुणीवर जबरदस्ती, काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल

कल्याण (ठाणे) : आपल्या पुतणीसोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली कल्याणमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र आढाव असे या पदाधिकाऱ्याचे नाव आाहे. तो कल्याण काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलचा अध्यक्ष आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र आढाव काँग्रेसचे बडे नेते संजय दत्त यांचा निकटवर्तीय आहे (Congress leader Surendra Adhav misbehave with girl in Kalyan).

नेमकं प्रकरण काय?

कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार तिचा काका सुरेंद्र आढाव आणि तिचे वडील हे नेहमी तिला, तिच्या आईला आणि भावाला घरगूती कारणावरुन मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी  तरुणी झोपली असता तिचे वडील त्याठिकाणी आले आणि दारुच्या नशेत तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी सुरेंद्र आढाव आले. त्यांनी तिला मारहाण केली. या दरम्यान तिचे कपडे फाटले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी काँग्रेसचे कल्याण जिल्हा अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष सुरेंद्र आढाव आणि त्यांच्या भावा विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे (Congress leader Surendra Adhav misbehave with girl in Kalyan).

काँग्रेसला केडीएमसी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातली आहे. कोरोना परिस्थितीत सुधारली की निवडणूक आयोगाकडून कधीही महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चेबांधनी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेस हा केडीएमसीत सारखा बॅकफूटवर असणारा पक्ष आहे. काँग्रेसला केडीएमसीत जास्त जागांवर विजय मिळत नाही. शिवसेना आणि भाजप त्याखालोखाल मनसे केडीएमसीत बाजी मारताना दिसतात. पण काँग्रेसला हवं तसं यश मिळत नाही. दुसरीकडे सुरेंद्र आढाव या नेत्याच्या या प्रकरणामुळे काँग्रेसला आणखी जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : कल्याणच्या बड्या बिल्डरच्या घरी ईडी टीम दाखल होताच बिल्डरची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI