आईला कोरोना म्हणून मुलाने घराबाहेर काढलं, मुलगी-जावायानेही पाठ दाखवली, मृतक वृद्धेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

| Updated on: Apr 26, 2021 | 3:07 PM

उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश सुन्न झालं आहे (Corona Positive old woman death due to her son and daughter not help).

आईला कोरोना म्हणून मुलाने घराबाहेर काढलं, मुलगी-जावायानेही पाठ दाखवली, मृतक वृद्धेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी
आईला कोरोना म्हणून मुलाने घराबाहेर काढलं, मुलगी-जावायानेही पाठ दाखवली, मृतक वृद्धेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी
Follow us on

लखनऊ : संपूर्ण देश सध्या कोरोना संकटाशी झुंजत आहे. डॉक्टर, नर्सेस, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करत आहेत. अनेक नातेवाईक आपल्या जवळच्या माणसांना घेऊन रुग्णांलयांच्या दारोदार फिरत आहेत. रुग्णाला बेड मिळावा यासाठी खटाटोप करत आहेत. देश सध्या प्रचंड भयानक स्थितीला तोंड देत आहे. मात्र, या भयानक परिस्थितीतही उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश सुन्न झालं आहे (Corona Positive old woman death due to her son and daughter not help).

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. कानपूर पोलिसांनी या व्हिडीओचा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. एक वृद्ध महिलेला तिच्या पोटच्याच मुलाने घराबाहेर हाकललं आणि रस्त्यावर सोडलं होतं. ती महिला आजारी होती. तिला कोरोना असेल या भीतीने मुलाने त्याच्या बहिणीच्या दाराशी महिलेला आणून सोडलं होतं. मात्र, वृद्ध महिलेच्या मुलीने आणि जावायानेही हात वरती केले. त्यांनी देखील वृद्ध महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे महिला रस्त्यावर चादर पांघरुन झोपलेली असायची.

सोशल मीडियावर महिलेचा व्हिडीओ व्हायरल

वृद्ध महिलेच्या मदतीसाठी पोटची मुलगी आणि मुलगा यापैकी कुणीही पुढे सरसावलं नाही. महिलेची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने सोशल मीडियावर महिलेचा व्हिडीओ टाकला. हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच परिसरातील पोलीस ठाण्याच्या हाती लागला (Corona Positive old woman death due to her son and daughter not help).

पोलिसांकडून महिला रुग्णालयात दाखल, पण….

पोलिसांनी व्हिडीओ पाहताच क्षणी महिलेची शोधाशोध सुरु केली. अखेर त्यांना महिला मिळाली. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मुलगा आणि मुलगी दोघांविरोधात कारवाई सुरु केली आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, ‘फोनपे’तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप