5

कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, ‘फोनपे’तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप

वॉर्ड बॉयने मयत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरुन 'फोन पे'च्या माध्यमातून त्याच्या अकाऊण्टमधील पैसे आपल्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे (Jalna ward boy finger prints)

कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, 'फोनपे'तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप
जालन्यात मयत रुग्णाचे बोटांचे ठसे वापरुन पैसे ट्रान्सफर
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 2:56 PM

जालना : ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाणे’ या शब्दप्रयोगाचा तंतोतंत प्रत्यय देणारी घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटांचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने त्याच्या खात्यातील रक्कम आपल्या अकाऊण्टमध्ये वळवली. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalna COVID Hospital ward boy transfers money from Dead Corona Patient account using finger prints)

जालना शासकीय कोव्हिड रुग्णालयात हा प्रकार घडला. वॉर्ड बॉयने मयत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरुन ‘फोन पे’ अॅपच्या माध्यमातून त्याच्या अकाऊण्टमधील पैसे आपल्या खात्यात वर्ग केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने याआधीही असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

कचरु पिंपराळे यांचे उपचारादरम्यान निधन

जालना शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या कचरु पिंपराळे यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना जिल्हा कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

पिंपराळे यांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी त्यांच्या खात्यातून काही पैसे ट्रान्सफर झाल्याचं कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल चेक केलं असता कचरु पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरुन फोनपे अॅपद्वारे 6 हजार 800 रुपये ट्रान्सफर केल्याचं कुटुंबीायंना समजलं.

मृत्यू पहाटे, दुपारी पैसे ट्रान्सफर

कचरु यांचा मृत्यू पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास झाला होता. त्यामुळे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे कसे ट्रान्सफर झाले, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला. पिंपराळे यांचा मोबाईल रुग्णालयातच राहिल्याचं त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं.

अंगठी-रोकडही चोरल्याचा आरोप

कोविड रुग्णालयातील वॉर्ड बॉयने कचरु पिंपराळे यांच्या निधनानंतर अंगठ्याचा ठसा वापरून खात्यातून 6800 रुपये परस्पर लाटल्याचे पुरावे कुटुंबीयांच्या हाती लागले. पिंपराळे यांच्याजवळ असलेली 34 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची अंगठी चोरी झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

डॉक्टर नवऱ्याने बायकोला लावला कोट्यवधीचा चुना, कशी केली फसवणूक?; वाचाल तर थक्क व्हाल

मुंबईतील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, ऑनलाईन पैसे पाठवण्याची मित्रांकडे मागणी

(Jalna COVID Hospital ward boy transfers money from Dead Corona Patient account using finger prints)

Non Stop LIVE Update
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
आमदार लढणार खासदारकी? काय आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती?
आमदार लढणार खासदारकी? काय आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती?
नार्वेकरांच्या दौऱ्यावरुन ठाकरे अन् भाजप आमनेसामने, तर राऊतांचीही टीका
नार्वेकरांच्या दौऱ्यावरुन ठाकरे अन् भाजप आमनेसामने, तर राऊतांचीही टीका
वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? काय आहे वाघनखांचा इतिहास?
वाघनखे महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन? काय आहे वाघनखांचा इतिहास?
आरक्षणावरुन दानवे आणि वडेट्टीवार आमने-सामने, बघा काय केले आरोप?
आरक्षणावरुन दानवे आणि वडेट्टीवार आमने-सामने, बघा काय केले आरोप?